एकूण 274 परिणाम
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 23, 2019
मुंबई : बजरंग पुनियाने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले सातत्य सिद्ध करताना आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या परविन राणाला रौप्य, तर सत्यव्रत काडियान आणि रवी कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा चीनमध्ये झीआन येथे सुरू आहे.  बजरंगने 65...
एप्रिल 22, 2019
झिआन (चीन) : ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यावर उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशा केंद्रित असतील. साक्षी, बजरंग खेरीज विनेश फोगट हे भारतीय संघातील आणखी एक आघाडीचे नाव असून, तिचेदेखील पदकाच्या शर्यतीत नाव घेतले जात आहे....
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कृषी विभागापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वच गोष्टींचा एकदा पंचनामा होऊ द्या,...
मार्च 31, 2019
सांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी महिनाभरापूर्वी कुणी सांगितलं असतं तर त्याला कृपामयीचा रस्ता दाखविला गेला असता. पण, राजकारणात अनपेक्षित काही नसतं. वसंतदादांच्या काँग्रेसचा बालेकिल्ला...
मार्च 30, 2019
मोहोळ : विजयराज डोंगरे यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे मन लावून केल्याने त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला, अद्यापही विकासकामे रखडलेली आहेत ती ही जरूर पूर्ण करू. विरोधकांना चाळीस वर्ष भरभरून दिले मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, स्वतःचा विकास केला कुठल्याही अडचणीच्या वेळी विजयराज यांच्या...
मार्च 13, 2019
प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शहरापासून जिल्ह्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ होण्यासाठी...
मार्च 11, 2019
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम केला आहे. २१ महाविद्यालयांत ४२०० विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली आहेत. कोल्हापूरला विकासाच्या...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
फेब्रुवारी 21, 2019
यवत - यवत पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई तात्या कऱ्हे व स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व प्रदिप कोडीतकर यांनी केलेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली. बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना आस्मान दाखवल्याने उपस्थीतांमध्ये या तिघांची चांगलीच...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
जानेवारी 25, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रकेसरी बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा सोनू यांच्यात 31जानेवारीला कुस्ती मैदान होणार आहे. पैलवान ग्रुपतर्फे राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही प्रथम क्रमांकाची कुस्ती होईल. माऊली जमदाडे विरुद्ध पवन दलाल यांच्यात द्वितीय, तर कौतुक डाफळे विरुद्ध विजय धुमाळ यांच्यात तृतीय क्रमांकाची लढत...
जानेवारी 22, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागलेले भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांचे नाव मागे पडून त्यांच्याऐवजी विक्रम पावसकरांचे नाव कार्यकर्त्यांतून पुढे आले आहे. त्यामुळे श्री. जाधव नाराज झाले असून, त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब...
जानेवारी 21, 2019
वडूज - नागाचे कुमठे (ता. खटाव) या गावाने सुमारे ६० ते ७० वर्षांपासून कुस्तीची परंपरा जोपासली आहे. कुस्ती प्रशिक्षणासाठी परगावी असलेल्या युवकांना दररोज एसटीने घरची दूध-भाकरी पुरवत गावकऱ्यांनी कुस्तीची पाठराखण, तर गावातील अनेक दानशूरांनी या  मल्लांना कुस्तीसाठी पाठबळ दिले आहे. त्यामुळेच गावाने...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 08, 2019
विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले.  द्वितीय क्रमांकासाठी सहा लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात महाराष्ट्र केसरी बाला...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे.  पिंपळे...
डिसेंबर 24, 2018
कोल्हापूर - यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार आणि लौकिकही कायम आहे; पण या महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी येणार? असे इथले कुस्तीशौकीन उघड विचारत आहेत. ८० तालमी व एक शासकीय कुस्ती केंद्र असूनही गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर कोल्हापूरच्या पैलवानाचे नाव...