सोनिया गांधींना सर गंगा राम रुग्णालयात हलविले

बुधवार, 3 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - प्रकृती अस्वास्थ्यामुळे उत्तर प्रदेशमधील "रोड शो‘ सोडून राजधानी दिल्ली परतलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (बुधवार) उपचारासाठी आर्मी रुग्णालयातून सर गंगा राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विटरद्वारे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी वाराणसी येथे आयोजित केलेल्या "रोड शो‘ दरम्यान सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटल्याने त्या "रोड शो‘ अर्धवट सोडून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. सोनिया गांधी वाराणसी येथे दाखल झाल्यानंतर त्यांना थोडा ताप होता. "रोड शो‘च्या धावपळीत त्यांचा ताप वाढला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. डॉक्‍टरांच्या एका पथकाने विमानतळावर त्यांच्यावर उपचार केले, अशी माहिती उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी दिली.

Web Title: Sonia

टॅग्स