ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होताच अर्थसंकल्पावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. निष्पक्ष निवडणुकीसाठी अर्थसंकल्प पुढे ढकलावा आणि लेखानुदान मांडावे. निवडणुकीनंतरच अर्थसंकल्प आणावा, अशी विरोधकांची मागणी आहे. या मुद्द्यावर कॉंग्रेस व सहकारी विरोधी...

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासोबत आज जपानचे भारतातील राजदूत केनजी हिरामत्सु यांची बैठक...

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने पाच किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. मुंबईतून क्वाललंपूरच्या दिशेने निघालेल्या विमानातून रबीखान अब्दुलाह प्रवास करणार होता. दरम्यान सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने...

नवी दिल्ली : रोझ व्हॅली चीट फंड गैरव्यवहारप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते तापस पाल, त्यांच्या पत्नी नंदिनी पाल आणि सौगाता रॉय यांनी आपल्या नावाचा समावेश केल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते बाबूल सुप्रियो हे दिवाणी व फौजदारी बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहेत. याबाबत बोलताना सुप्रियो म्हणाले, "मी...

तिरुपती : आंध्रप्रदेशमधील कोणत्याही व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. श्रीपद्मावती महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या...

बंगळूर: नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी आज सांगितले. याबाबत पोलिसांनी...

पुद्दुचेरी : कार्यालयीन कामकाजासाठी संवादाचे साधन म्हणून फेसबुक, व्हॉटसऍपसारख्या सोशल मिडियचा वापर करता येणार नसल्याबाबत पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी काढलेले परिपत्रक नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रद्दबातल ठरविले आहे. बेदी यांनी ट्‌विटरद्वारे हे परिपत्रक रद्द करत असल्याचे...

नवी दिल्ली- सर्व नागरिकांना त्यांचा 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम' किंवा नियमित सरकारी वेतन देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. याबाबतचा सरकारडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, त्याला मंजुरी मिळणार का याबाबत साशंकता आहे. या निर्णयाला मंजुरी मिळाल्यास नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील...

हैदराबाद : काळा पैसा नष्ट करण्यासाठी घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय हा सर्जनशील नाश आणि 1991 साली राबविण्यात आलेल्या सुधारणांनंतरचे सर्वात विस्कळित धोरण आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केली आहे. "8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेने एका...

पाटना (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे दारूबंदीचे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) या निर्णयाबद्दल नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. पाटना येथील गांधी मैदान येथे आयोजित प्रकाश पर्व कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी...

ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे  ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. पण मग अशा या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे?  सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी...

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी आज (गुरुवार) प्रसिद्ध केली आहे. या यादीत 34 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. यादीमध्ये रामपूर मतदारसंघातून नवाब क्वाझीम अली खान, चामारूवा मतदारसंघातून अली युसूफ अली,...

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी...

कोलकता- बलात्कार करणाऱया गुन्हेगाराने कारागृहात तिच्याशी विवाह केल्याची घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया कारागृहात घडली आहे. मनोज बौरी (वय 30) याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली सन 2010 मध्ये अटक झाली होती. बलात्काराच्या घटनेनंतर पीडीत महिलेने एका मुलाला जन्म दिला होता. या घटनेनंतर बौरी याने पीडीत...

इंदोर- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी स्वीय सहाय्यकाच्या (पीए) हातात बुट दिल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. यामुळे चौव्हाण चर्चेत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पन्ना जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

ओरेम (उटाह) : खेळता खेळता ओढवलेल्या संकटातून एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने प्रयत्नांची पराकाष्टा करीत आपल्या जुळ्या भावाचा जीव वाचवला. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ जगभरात सोशल मीडियावर आश्चर्य आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. कॅमेरामध्ये कैद झालेला दोनच मिनिटांचा अमेरिकेतील ओरेम येथील हा प्रसंग...

वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.  ट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक म्हणून शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या 'ट्रांझिशन टीम'ने...

नवी दिल्ली: केंद्र सरकारने बाद ठरविलेल्या चलनी नोटांपैकी तब्बल 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत, अशी आकडेवारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेतमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे काळ्या पैशाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले...

नवी दिल्ली- उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला असताना गुरुवारी सकाळी दाट धुके पडल्यामुळे किमान 70 रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत, तर इतर सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.  संपुर्णा क्रांती एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा तब्बल 26 तास उशिरा धावत आहे....

नवी दिल्ली - जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने हताश झालेल्या गरीब महिलेने बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या प्रादेशिक कार्यालयासमोर अखेर अर्धनग्न होऊन निषेध नोंदविला. रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयसमोर ही महिला आपल्या चिमुकल्या मुलासह आली होती. वारंवार विनंत्या करूनही सुरक्षारक्षक तिला जुन्या नोटा बदलून...

लखनौ- स्वतःच्या कुटुंबातील नऊ मुलींसह एकूण 10 जणांचा खून करून एका 50 वर्षीय व्यक्तीने स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात घडली आहे.  संबंधित कुटुंब राहत असलेल्या घरामध्ये त्यांचे गळा चिरलेले मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी बुधवारी...

मुंबई - बॉलीवूडच्या 'मस्तानी'ने अर्थात दीपिका पादुकोणने आपल्या अदांनी अख्ख्या जगाला वेड लावले आहे. आज (गुरुवार) तिचा वाढदिवस आहे; मात्र मेक्‍सिकोत असलेली दीपिका नेहमीप्रमाणे आपल्या वाढदिवशी बॉलीवूडमधील मित्र-मैत्रिणींसाठी पार्टी न देता चक्क 14 तास काम करून हटके सेलिब्रेशन करणार आहे. दीपिकाचा...

मुंबई - विक्रीळीजवळ लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक लवकरच पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीजवळ लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धीम्या मार्गावर लोकल बंद पडली असून सीएसटीकडे जाणारी...

वॉशिंग्टन- आपल्या आठ वर्षांच्या कार्यकालामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत-अमेरिका संबंध सुधारण्यासाठी "सखोल" गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये राजनैतिक आणि आर्थिक असा मोठा लाभ आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.  "राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवर मोठा फायदा होईल...

#OpenSpace

भारतात सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या अमेरिका आणि ब्राझिल या देशांपेक्षा अधिक आढळली आहे. दुसरीकडे राजस्थानमधील...

नवी दिल्ली, ता. १२ : लॉकडाउनमुळे गेले साडेचार महिने प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागलेल्या रेल्वेने यंदा पहिल्या तिमाहीत तब्बल १०६६...

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) मैदानावरील जम्बो रुग्णालयाची तयारी वेगाने सुरू आहे....