ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

पुणे :" कोरोनाशी सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशी अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा कठीण परिस्थितीत बांधकाम क्षेत्रास रूळावर आणण्यासाठी सहा कलमी उपाययोजना तातडीने राबावाव्यात,' अशी मागणी क्रेडाई नॅशनलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली...

नाशिकरोड : लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांनी पूर्वनियोजन केलेल्या रेल्वेचे आरक्षण तिकीट रद्द करण्यास आज 25 मेपासून सुरवात झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पहिल्याच दिवशी सुमारे सहा लाखांचा रिफन्ड करण्यात आला. रेल्वेने ऐन वेळेवर जाहीर केलेल्या पत्रकामुळे अनेक लोकांना माघारी फिरावे लागले. भारतातल्या अनेक...

नांदेड ः वाडी तांड्याला समस्या ह्या पाचवीला पूजलेल्याच. त्यात कुठून तरी कोरोना आलाय, आणि तो आपल्या भागात येइल, असे कधी कुणाला वाटले नव्हते. मात्र, कोरोनाने वाडी-तांड्याचा रस्ता धरल्याने अनेकांची झोप उडाली आहे. असेच दोन बाधित रुग्ण तांड्यावर सापडल्याने गावेही सुरक्षित राहिली नाहीत.    ...

पुणे : मुंबई शहर वगळता राज्यातील बांधकामासाठी सरकारने एकात्मीक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली (Unified DCPR) प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. मात्र अद्याप ती नियमावली प्रसिद्ध न झाल्याने नवीन बांधकाम प्रकल्प अडकले आहेत.  - विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता...

नांदेड : उमरी तालुक्यातील नागठाणा येथील साधू व त्याच्या शिष्याचा पैशासाठी खून करून साधूजवळील रोख रक्कम व किंमती साहित्य लंपास केल्याची कबूली आरोपीने पोलिसांना दिली. साधूला त्यांच्याच वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार...

मुंबई : एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नव्याने नोंदणी आणि अपूर्ण अर्ज भरण्यासाठी संधी देण्याची विनंती सीईटी सेलकडे केली होती. त्याची दखल घेत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अखेरची संधी दिली असून, त्यासाठी 1 जूनपर्यंत मुदत दिली आहे. नक्की...

नाशिक / अस्वली स्टेशन : १४मे रोजी रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याच रुग्णावर भायखळा येथील भारतीय रेल्वेच्या दवाखान्यात हृदयरोगावर रुग्णावर डायलिसिस पध्दतीने उपचार सुरु होते. मात्र सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील उपचार पध्दतीमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी...

ठाणे : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश थबकला असला तरी, घरात बसुन या संधीचा सदुपयोग कसा करावा,याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी दिले आहे. ठाण्यात राहणाऱ्या अक्षत मोहिते आणि पेण येथील प्रज्ञेश म्हात्रे या दोन महाविद्यालयीन युवकांनी अंतराळातील चार लघुग्रह शोधले आहेत.  हे ही...

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटाने जागतिक पातळीवर सर्वांचीच गणिते बदलली. राज्यातील राज्य मार्ग परिवहन मंडळही त्याला अपवाद राहिले नाही. दोन महिने वाहतूक ठप्प असल्याने आता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा एसटीच्या व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू होता. आजपासून एसटीने प्रवासी वाहतुकीसोबतच...

सोलापूर : महापालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले वाटण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाचे बिल थेट भरल्यास पाच टक्के तर ऑनलाईन भरल्यास सहा टक्के सवलत मिळणार आहे. 31 जुलै 2020 पर्यंत ही सवलत असणार आहे. थकबाकी असलेल्या मिळकतदारांना ही सवलत मिळणार मिळणार नाही. कोरोना महामारीमुळे...

सातारा- कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात आज (साेमवार) आठव्या काेराेनाबाधिताचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती ही वाई तालुक्यातील आसले येथील आहे. ते मुंबईतून वाई येथे नुकतेच आले हाेते. अन्य एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती देखील वाई तालुक्यातीलच आहे. दरम्यान आज कृष्णा...

कोल्हापूर : महापुराच्या धोक्‍यापासून अलर्ट राहावे, यासाठी महावीर महाविद्यालय परिसरातील विन्स हॉस्पिटलतर्फे पंचगंगा नदीत आज रेस्क्‍यू बोटीची चाचणी घेण्यात आली. आठ सीटर ही बोट असून, हॉस्पिटलतर्फे दहा लाईफ जॅकेटस्‌ची खरेदी केली आहे.  पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, हॉस्पिटल्स, दुकाने,...

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतुक विभागात कार्यरत पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा हजाराच्या पार गेलाय. तर राज्यात आतापर्यंत एक हजार 809 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत वाहतुक पोलिस विभागात कार्यरत पोलिल हवालदाराचा रविवारी मध्यरात्री...

मुंबई ः अभिनेता ह्रतिक रोशनने आपल्या एकूणच चित्रपट कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे ऍक्शन आणि डान्समध्ये तो कमालीचा तरबेज आहे. लहान मुले त्याची खूप फॅन्स आहेत. कहो ना प्यार हैपासून त्याची चित्रपट कारकीर्द  सुरू झाली असली तरी त्याच्या अभिनय कारकिर्दीतील गाजलेली...

पुणे : लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी होऊ लागली. दरम्यान खासगी वाहनामधून विमानतळावरुन ये-जा करणाऱ्या विमान प्रवाशांकडील बोर्डिंग पास हाच डिजीटल पास म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे, त्यासाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त...

पुणे : वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कारागृहातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कैद्याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार रविवारी सायंकाळी येरवडा येथे घडला. बाळासाहेब गोविंद कांबळे (वय ५०) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कैद्याचे नाव आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...

वरुड (जि. अमरावती)  : छम छम वाजणाऱ्या घुंगरांचा आवाज, दुपट्ट्यात हात घालून बोटांच्या हालचालींवर होणारे व्यवहार, तीस हजारांपासून एक ते दीड लाखांपर्यंत लागणारी बैलजोडींची बोली, असे सारेकाही सुने सुने झाले आहे. तब्बल 70 वर्षांचा इतिहास असलेला राजुराबाजार येथील इंग्रजकालीन बैलबाजार कोरोनामुळे...

मुंबई- बॉलीवूड एकानंतर एक अशा दिग्गजांच्या निधनाने हादरुन गेलं आहे. नुकतीच अभिनेता वरुण धवनच्या मावशीच्या निधनाची बातमी समोर आली होती आणि आता वरुणच्या मावशीच्या निधनानंतर आता आणखी एका सेलिब्रिटींच्या वडिलांचं निधन झालं आहे.  बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती...

नागपूर : कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लावण्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवार प्राध्यापकांना ई-मेलवर अर्ज पाठविण्यास सांगण्यात आले. याशिवाय टाळेबंदी हटल्यावर अर्जाची "हार्डकॉपी' सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात...

कल्याण :  कल्याण पूर्व मध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच झोपडपट्टी आणि बैठ्या चाळीचा परिसर असलेल्या आनंदवाडीमधील एकाच घरात 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी स्वच्छतेच्या उपाययोजना कागदावर असल्याने आनंदवाडीची धारावी झाल्यावर पालिका...

पुणे : दिल्लीतील किशोरवयीन मुलांनी घडवून आणलेल्या "बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर काहीशी उशिरा का होईना, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) जाग आली. म्हणूनच आता किशोरवयीन मुलांकडून सोशल मिडियाचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी सीबीएसईने "सायबर सेफ्टी'या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे (हॅण्डबुक...

पाली : लॉकडाऊनमुळे पानपट्टी व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च भागविण्यासाठी येथील एका पानदुकान चालकाने चक्क आपल्या बंद पानपट्टीसमोर अंडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा...

नाशिक : कोरोना विषाणूच्या सावटाखाली मालेगाव आणि जिल्ह्यात "रमजान ईद' मुस्लिम बांधवांनी घरात थांबूनच साजरी करण्यात आली. याप्रमाणे, मंगळवारी (ता. 26) बासी आणि बुधवारी (ता. 27) तिवासी ईदनिमित्तानेही घरातच नमाज पठण करून साजरी करावी असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले...

विश्रांतवाडी (पुणे) : धानोरी येथील भिमलहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना व दान प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाउनमुळे पुण्यात अडकलेल्या पूर्व पुणे भागातील गरजू कामगारांना आपल्या स्वगृही परतण्यासाठी पुणे ते पश्चिम बंगाल अशी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या प्रवास काळात अन्नपुरवठा...

#OpenSpace

पुणे : देशभर विखुरलेल्या बंगालींजणांना सुखरूपपणे त्यांच्या गावी परत आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली...

मुंबई - कोरोना संकटामुळे टाटा समूहाने आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचा...

मुंबई  - अनिल अंबानी यांच्या समोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अंबानी दिवाळखोर झाले असून बँकांची कर्ज फेडण्यासाठी...