ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

पातुर्डा फाटा : संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील एका युवा शेतकऱ्ने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.  राहुल जनार्दन म्हसाळ (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राहूल व त्याचे आई, वडील शेतात गेले होते. आभाळ भरून...

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदी व जीएसटीवरुन केंद्र सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय पडसाद अजूनही उमटत आहेत. सिन्हा यांनी काल (गुरुवार) "मी जर अर्थमंत्रीपदासाठी इच्छुक असतो; तर जेटलींना संधीच...

अक्कलकोट : दिवाळीच्या वस्तू व फराळ अल्प दराने विक्री करणाऱ्या बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बसस्थाकावर रुपये १ नाममात्र इतके शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दि...

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 11 मार्गांवर एक मिनिटाला तर 13 मार्गांवर दर 3 मिनिटांना प्रवाशांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणि पीएमपीच्या उत्पन्नातही भरघोस वाढ झाली आहे. 'पीएमपी फास्ट'चा दावा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक...

पिलखोड (ता. चाळीसगाव) :  पिंपळवाड म्हाळसा(ता. चाळीसगाव) शिवारात महिलांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'ट्रॅप कॅमेरे' लावण्यात आले असून 'शार्प शूटर' यांना पाचारण करण्यात आले आहे.  'गिरणा'...

म्हसदी (धुळे) : पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने आज सकाळी पुणे येथील झांबरे सभागृहात राज्यातील बावीस बाजार समित्यांचा उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाचे काम केल्याने गौरव करण्यात आला. त्यात साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश होता. राज्यात कृषी उत्पन्न...

मोखाडा - राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी एकत्र येउन, 11 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. संपावर जाण्यापूर्वी बाल विकास प्रकल्पाधिकारी कार्यालयांना, कुपोषित बालकांच्या स्थितीची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिलेली नाही. त्यामुळे मुळातच कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या...

धुळे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. एकशे आठपैकी आठ पंचायतींची निवड बिनविरोध झाली आहे. शंभरसाठीचा रणसंग्राम हा सरपंच पदाच्या निवडणूकीमुळे कधी नव्हे एवढा चुरशीचा झाला आहे. मेहरगाव वगळता काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये साटेलाटे राहणार आहे. भाजप -शिवसेनेमध्ये...

कल्याण : गुरुवारी रात्री विजेचा कडकडाट करत मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली, यात 13 झाडे कोलमडली असून यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाले नसल्याचे समजते मात्र काही काळ नागरिकांना अंधारात राहावे लागले . गुरुवार ता 28 रोजी सायंकाळी सात साडे सात नंतर...

मुंबई : निकालाचा गोंधळ घालणाऱ्या मुंबई विद्यापीठाला हरवलेल्या उत्तरपत्रिका शोधण्यात आलेले अपयश लक्षात घेत 1600 विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. निकाली गोंधळ घालणाऱ्या मेरिट ट्रेक कंपनीची सेवाही मुंबई विद्यापीठ आगामी सत्र...

सांगली - बनावट दुधाद्वारे लोकांना विष पाजण्याचा काळाबाजार हा डोर्ली (ता. तासगाव) येथील बबन देशमुख याचा ‘फॅमिली’ बिझनेस असल्याची माहिती पुढे आली आहे. बबनचा भाऊ बाळासाहेब याला अन्न व औषध प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बनावट दूधप्रकरणी ८० हजारांचा दंड केला होता. लाखो रुपयांचे बनावट दूध बनवले तरी...

चिक्‍कोडी - कार्पोरेट विश्‍वाची सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही जाज्ज्वल्य देशप्रेम आणि समाजाप्रती असलेली तळमळ यासाठी त्याचा त्याग केलाच, शिवाय समाजाला भरीव योगदान देण्यासाठी  त्याने स्वत:च्या मालकीच्या कोट्यवधीचे मूल्य असलेल्या शेतात श्रमदानातून सुसज्ज क्रीडांगण उभे केले. मलिकवाड (ता....

टाकवे बुद्रुक : आंबळे येथे धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली. नवनाथ खंडू येवले (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. आंबळे गावाजवळ येवले याचा गोठा, पोल्ट्री फार्म व शेती असून, येथेच ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत मारेकरी पसार...

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबरोबरच इराणवरही ताशेरे ओढले आणि त्या देशाला 'दहशतवादी समर्थक' म्हणून घोषित केले. इराणच्या अणू कार्यक्रमासंदर्भातील आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी आणि इतिहासातील सर्वांत वाईट असल्याची संभावना ट्रम्प यांनी...

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड.  वेळ : धार काढण्याची.  प्रसंग : धारदार!  पात्रे : धारदारच!!  (राजाधिराज उधोजीराजे आपल्या महालात सायकलीवर बसून तलवारीला धार काढत आहेत. धारेच्या ठिणग्या उडतात. तेवढ्यात 'हहहहह' असे हास्य ऐकू येते. राजे चमकतात. पुन्हा धारकाम! उधोजीराजे...

भाजपची राजकीय खलबते; काँग्रेसने स्वीकारले "सॉफ्ट हिंदुत्व' अहमदाबाद : आरक्षणाबाबत गुजरात सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने आक्रमक झालेल्या पाटीदार समाजाच्या नेत्यांनी आता सवतासुभा मांडला आहे. पटेल गळाला लागत नसल्याचे लक्षात येताच भाजपनेही अन्य जातीय संघटनांना जवळ करायला सुरवात...

पुसेसावळीतील सीताबाई पवार यांच्या चार मुली प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, प्राध्यापकपदी पुसेसावळी - ज्या काळी ‘चूल आणि मूल’ ही व्याख्या महिलांसाठी लागू होती. त्या काळी येथील चर्मकार समाजामधील सीताबाई पवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या चारही मुलींना उच्च...

वडगाव निंबाळकर - ‘‘सरपंच जनतेतून निवडला गेला आणि सदस्य मंडळाचे बहुमत नसेल, तर विकासकामे होतील का? जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान जनतेतून निवडत नाहीत? मग सरपंचांची निवडणूक जनतेतून का?  सरकारचा हा निर्णय लोकशाहीला घातक आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली....

नवी दिल्ली : प्रो कबड्डीचा पाचवा मोसम अर्ध्याहून जास्त झाला आहे. आता सहाव्या मोसमाबाबतचा प्राथमिक विचार सुरू झाला आहे. ही स्पर्धा याच सुमारास म्हणजेच पावसाळ्याच्या उत्तरार्धात सुरू करण्याचा विचार असला तरी ऑगस्टच्या उत्तरार्धात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा प्रो कबड्डीचा आगामी मोसम घेण्याबाबत प्रश्...

कऱ्हाड - दलित, आदिवासी व ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता 50 टक्‍क्‍यांपैकी 25 टक्‍क्‍यांमध्ये मराठासह अन्य जातींना आरक्षण द्यावे, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला आहे. त्यासाठी प्रयत्नशीलही असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मी...

मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून, या...

पुणे : एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मोसमात ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता न्यूझीलंड भारताचा दौरा करणार असून, त्यांच्या विरुद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर (25 ऑक्‍टोबर) होणार आहे. या सामन्यासाठी 'एमसीए' मैदान...

"उरी' सिनेमाकडे सर्वांचे लक्ष; गोखले लिखित पुस्तकाचे आज प्रकाशन नवी दिल्ली : भारतीय लष्कराची सर्वाधिक आक्रमक कारवाई म्हणून ओळखल्या गेलेल्या "सर्जिकल स्ट्राइक' देशपरदेशात चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय लष्कराने या वेळी दाखविलेल्या शौर्य आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. केंद्र सरकारनेही याचा...

सावंतवाडी -  शहरातील प्रथितयश सुवर्णकाराला अज्ञाताकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

#OpenSpace

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ...

नवी दिल्ली, ता. 04 : टेलिकम्युनिकेशन कंपन्या सध्या ग्राहकांसाठी इंटरनेट डेटा आणि कॉलिंगसाठी मोठ्या ऑफर्स देत आहेत. लॉकडाऊनच्या...

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी पैशांसाठी आपले बंधू अनिल अंबानी यांना...