ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने आपल्या सर्वांना पुढील 50 दिवस आपले खाते असलेल्या बँकेत नोटा जमा करता येणार आहेत. दरम्यान, जास्त रोकड घेऊन जाणाऱ्या लोकांना लुटण्यासाठी बॅग चोर या संधीची वाट पाहत बसलेले असतील. त्यामुळे याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी...

पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्‍नांची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील, असे म्हणत शिवसेनेने नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र काळ्या...

वॉशिंग्टन - मी प्रत्येक अमेरिकी नागरिकाचा अध्यक्ष असून आपण सर्वांनी एकत्र येऊन देश नव्याने घडवूया, असे आवाहन करत नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. माझ्याकडे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी आराखडा तयार असून आता आणखी वेगाने देशाचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे....

नवी दिल्ली - काळा पैसा उघडकीस आणण्यास काँग्रेसचा तत्त्वतः पाठिंबा आहे; पण केंद्र सरकारतर्फे नोटा रद्द करण्यामुळे किती प्रमाणात काळा पैसा बाहेर येईल याबाबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेसतर्फे बोलताना शंका व्यक्त केली. २००० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याचा सरकारचा निर्णय कोड्यात...

वॉशिंग्टन - सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (वय 70) यांनी बाजी मारली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रातिनिधिक मतांचा (इलेक्‍टोरल...

मुंबई- सरकारने काळ्या पैशाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, तो ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष (भाजप) निवडणूकांमध्ये काय आपट्याची पाने वाटणार काय? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचशे व...

नवी दिल्ली: देशांतर्गत आर्थिक व्यवहारात पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम झाला आहे. फ्लिपकार्ट व स्नॅपडीलसारख्या कंपन्यांनी रु.1000 ते रु.2000 दरम्यान उत्पादनांच्या वितरणावर 'कॅश ऑन डिलीव्हरी' सेवा बंद केली असून प्रतिस्पर्धी अॅमेझॉननेदेखील ही...

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विजयाबद्दल ट्विटरवरून आज (बुधवार) अभिनंदन केले. ट्विटरवरून मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन. यापुढील काळात भारत-अमेरिका एकत्रित काम करून दोन्ही...

नाशिक- पाचशे-हजाराच्या नोटा बंद होताच, एटीएम, बॅंक, टपाल कार्यालयातील नोटांचे शटर डाऊन झाले. पण त्याचवेळी रेल्वे बुकींग काऊंटर, सुवर्णपेढ्यांसह पेट्रोलपंपावर नोटांचा वर्षाव झालाय. हे चित्र नाशिकच्या बाजारपेठांमध्ये आज (बुधवार) पाहायला मिळाले. बाजार समित्यांमध्ये येवल्यात शेतकऱ्यांनी पाचशे,...

जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीची चर्चा साधारणपणे वर्षापासून सुरू होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेचे अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेकांनी अंदाजही व्यक्त केले होते. बहुचर्चित अशा अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार...

नागरिकांना पॅनीक न होण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन औरंगाबाद- देशातील पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करायचा निर्णय घेतल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. पॅनीक व्हायची गरज नाही. चिंता काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावी. असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "...

नवी दिल्ली - भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हणत या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. मंगळवारी रात्री अचानक एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी चलनात असलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्यात...

नवी दिल्ली - कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅरिस यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. 51 वर्षीय हॅरिस यांनी...

मुंबई - हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैशावाल्यांना घाम फुटला असला तरी सर्वसामान्यांचे यामुळे हाल झाले आहेत. काळा पैशांविरोधातील या सर्जिकल स्ट्राईकने राज्यातील महामार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाक्‍यावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा...

मुंबई - मोदी सरकारच्या हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या निर्णयासाठी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. मंगळवारी केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याची घोषणा...

नवी दिल्ली - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याशिवाय आज (बुधवार) सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील सर्वच बॅंका तसेच पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. आज बँकांचे एटीएम देखील बंद राहणार आहेत. काही ठराविक एटीएम...

न्यूयॉर्क - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काही वेळातच लागणार असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालातून डोनाल्ड हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यंदाची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वाधिक चुरशीची ठरल्याची चर्चा करण्यात येत आहे. अध्यक्षीय...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक या दोन प्रमुख कारणांचा आज भारतातील शेअर बाजारावर विपरित परिणाम दिसून आला असून सोन्याचे भावही वधारले आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज 1600 अंशांची घसरण आढळून...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. या नव्या नोटांचे नमुनेही जाहीर करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर "एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना मधुमेह असून, छातीत दुखायला लागल्याने सोमवारी (ता. 7) रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले. हृदयरोग तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातही सुषमा स्वराज...

मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वाढून 8 हजार 543...

रोजगाराच्या जाहिराती पेजवर; ऍडमिन अर्जही स्वीकारणार न्यूयॉर्क : 'फेसबुक'वर पेज ऍडमिनिस्ट्रेटर लवकरच नोकरीची जाहिरात करण्यासोबत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारू शकणार आहेत. यामुळे लिंक्‍डइन या कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. याविषयी माहिती देताना फेसबुकचा प्रवक्ता...

जम्मू/नवी दिल्ली- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबाराला सुरवात केली. भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूंनी...

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, 'अडवानी हे देशातील आदरणीय नेते आहेत आणि आपल्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांनी अथकपणे देशाची सेवा केली आहे. त्यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो...

#OpenSpace

पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशनने (सीआयएससीई) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ यासाठी नववी ते बारावीचा अभ्यासक्रम...

अकोला  ः जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून ते शनिवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे पऱ्हाटीचे...

बुलडाणा ः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चांगले काम करतात की नाही ? यावरून भाजप आणि शिवसेनेच्या...