नाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनीस स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनीस स्पर्धा बुधवार (ता. 8) पासून रविवार (ता. 12) दरम्यान नाशिक जिमखाना येथील क्रीडा संकुलात होणार आहेत. ही माहिती संघटनेचे व संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी यांनी पत्रकार परीषदेत दिली. 

श्री. छाजेड म्हणाले, की पाच दिवस होणाऱ्या या स्पर्धा आठ टेबलवर होतील. स्पर्धेत 710 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा पुरूष, महिला, मुले व मुली अशा बारा वेगवेगळ्या गटात होणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य टेबल टेनीस संघटनेतर्फे प्रमुख पंच म्हणून रोहित शिंदे (ठाणे), उपपंच प्रमुख विलास बावकर (पुणे) यांची नियुक्‍ती केली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन बुधवारी (ता. 8) सकाळी साडेदहाला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या उपस्थितीत होईल. तसेच अर्जुन पुरस्कार विजेता टेबल टेनीसपटू कमलेश मेहता याची प्रमुख उपस्थिती असेल. भाजपचे सुहास फरांदे, महेश हिरे, राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस उपस्थित राहाणार आहेत... 

असे आहेत गट: महिला व पुरूषांचे खुले गट असेल. याशिवाय मुलामुलींमध्ये मिडजेट, कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ या गटात स्पर्धा होणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news table tennis competition