Asian Games 2018 : रोहन बोपण्णा-दिविज शरणला टेनिस दुहेरी स्पर्धेत सुवर्ण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने आशियाई स्पर्धेत टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. कझाकिस्तानच्या अॅलेक्सझॅंडर बुबलिक आणि डेनिस येव्हसेयेव या जोडीवर त्यांनी 6-3,6-4 सहज विजय मिळवला. भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे सुवर्ण पदक आहे.  

जकार्ता : भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने आशियाई स्पर्धेत टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. कझाकिस्तानच्या अॅलेक्सझॅंडर बुबलिक आणि डेनिस येव्हसेयेव या जोडीवर त्यांनी 6-3,6-4 सहज विजय मिळवला. भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे सुवर्ण पदक आहे.  

पहिला सेट 6-3 असा सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी 2-2 अशी बरोबरी साधली मात्र शेवटच्या क्षणी खेळ उंचावत बोपण्णा-शरणने 6-4 असा विजय मिळवला. 

18व्या आशियाई स्पर्धेतील टेनिसमधील हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. लिअॅंडर पेसने अचानक घेतलेल्या माघारीमुळे भारतीय टेनिस संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र बोपण्णा- शरण या जोडीने उत्तम खेळ करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

Web Title: rohan bopanna and divij sharan wins gold in asian games 2018 tennis doubles