Read Latest & Breaking congress leader Marathi News. Get Trending & Top News Headlines on congress leader along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास त्यानिमित्ताने त्यांच्या माध्यमातून अक्कलकोट, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा आणि सोलापूर दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ मिळू शकते.
कॉंग्रेसचे ‘नवसंकल्प शिबिर’ नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसची सद्यःस्थिती आणि सध्याचे राजकारण याविषयी घेतलेली मुलाखत.
पहिल्या टप्प्यात (जुलै-ऑगस्ट) शहरी भागातील महापालिका, नगरपालिकांची तर दुसऱ्या टप्प्यात (सप्टेंबर-ऑक्टोबर) जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली आहे.
शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे टार्गेट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले होते. पण, ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली.
सत्ता आपलीच येणार असल्याने ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकातच बंद करून ठेवावा लागला. सर्वांनी भाजपची विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. पण, सक्षम विरोधक म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरून विशेषत: भ्रष्टाचाराच्या विषयावरून जेरीस आणले. तरीही, ईडीच्या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे.
सोलापूर, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. तेथील लोकांनाही महाराष्ट्रातच राहायचे आहे. त्यामुळे त्याच्या बदल्यात बेळगाव घेतल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. पण, बेळगाव, निपाणी, बिदर व कारवार यासाठी आमचा लढा कायमस्वरूपी असेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीरून सत्ता मिळाल्यानंतर भाजपने लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केंद्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असणार आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणितींना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपचे खासदार डॉ. महास्वामींना टार्गेट केल्याचीही चर्चा आहे.
कर्नाटक आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला, ब्लॅकमेलिंग करून सत्ता मिळविली. आता तोच प्रकार महाराष्ट्रात केला जात आहे. भाजपच्या विरोधातील नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी लावली जाते. मग, आता देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात जबाब देण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर एवढी भीती, कांगावा करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय, असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
शहराभोवतीच्या चार विधानसभा मतदारसंघापैकी शहर मध्य हा मतदारसंघ वगळता दक्षिण सोलापूर, शहर उत्तर आणि अक्कलकोट या तिन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही आपला गड राखला. त्यांच्या विजयातील महत्त्वाच्या शिलेदारांना आपल्या पक्षात घेण्याचा डाव राष्ट्रवादीतील तथा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरील काही नेत्यांनी आखल्याची चर्चा आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.