Congress MLA News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MLA

Read Latest & Breaking Congress MLA Marathi News. Get Trending & Top News Headlines on Congress MLA along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य
सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची मेगाभरती होऊ शकते, अशी माहिती राज्याच्या वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
फडणवीस सरकारची ‘ही’ योजना गुंडळाली! ठाकरे सरकारने आमदारांना दिला नाही निधी
केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर तत्कालीन फडणवीस सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. दरवर्षी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वाकोटींपर्यंत निधी मिळत होता. पण, मागील पावणेतीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने एकाही आमदारास त्या योजनेतून निधी दिलेला नाही. त्यामुळे ही योजना गुंडळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसला आणखी एक धक्का
गुजरातमधील तीन वेळचे आमदार कोतवाल भाजपमध्ये
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून इच्छुकांचा अंदाज घेऊन उमेदवारी निश्चित केली जात आहे. सोलापूर महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतील.
‘मी पुन्हा येईन’! आमदारांना वाटतेय का ईडीची भीती?
सत्ता आपलीच येणार असल्याने ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकातच बंद करून ठेवावा लागला. सर्वांनी भाजपची विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. पण, सक्षम विरोधक म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरून विशेषत: भ्रष्टाचाराच्या विषयावरून जेरीस आणले. तरीही, ईडीच्या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे.
पेट्रोल 49.02 तर डिझेलची मूळ किंमत 50.50 रुपये! पण, द्यावे लागतात 113 रुपये
जुलै 2022 पासून जीएसटी अनुदान मिळणार नसल्याने राज्याच्या तिजोरीतील महसूल 20 हजार कोटींनी कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील टॅक्‍स कमी करणे पडवणार नाही, असे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी
शहराभोवतीच्या चार विधानसभा मतदारसंघापैकी शहर मध्य हा मतदारसंघ वगळता दक्षिण सोलापूर, शहर उत्तर आणि अक्‍कलकोट या तिन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही आपला गड राखला. त्यांच्या विजयातील महत्त्वाच्या शिलेदारांना आपल्या पक्षात घेण्याचा डाव राष्ट्रवादीतील तथा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरील काही नेत्यांनी आखल्याची चर्चा आहे.
ओबीसींशिवाय की ओबीसींसह निवडणूक! महापालिकेवर आजपासून 'प्रशासक'राज
निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील बिल राज्य सरकार उद्या दोन्ही सभागृहात मांडणार आहे. पण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्यासाठी साधारणत: तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो..दुसरीकडे राज्य सरकारचा निर्णय अंतिम की राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर कॉंग्रेसमध्ये गटबाजी! युवकाध्यक्षांनी मागितला शहराध्यक्ष, कार्याध्यक्षांचा राजीनामा
आगामी महापालिकेत महापौर आमचाच, अशी वलग्ना करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागल्याची स्थिती आहे. शहर युवकाध्यक्ष अंबादास करगुळे यांनी थेट शहराध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचा राजीनामा मागितला आहे.
मतविभाजन हाच 'एमआयएम'चा डाव! महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्षांची टीका
'एमआयएम' हा पक्ष स्वतःच्या राज्यात केवळ सात विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढतात. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात किमान 100 जागा लढविल्या जातात. त्यामागे केवळ मतविभाजन हाच त्यांचा हेतू राहिल्याची टीका महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी सोलापुरात केली.
    go to top