Read Latest & Breaking Corbevax Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corbevax along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने प्रशासन रुग्णवाढीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी (ता. २) शहरात २८ तर ग्रामीणमध्ये १८ नवीन रुग्णांची भर पडली असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या आता १८३ झाली आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, वसई-विरार, पनवेल, पुणे व रायगड शहरांमध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. तीन लाटा येऊन गेल्यानंतरही राज्यातील एक कोटी नऊ लाख व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर पावणेतीन कोटी व्यक्तींनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही.
राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे
जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३२ लाख २६ हजार जणांनी पहिला तर २३ लाख ५६ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चौथ्या लाटेची शक्यता धूसरच असून प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एक हजार ५२६ रुग्ण असून सातारा, सांगली, नंदूरबार, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
१८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर (संरक्षित) डोस मिळणार असून त्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, शहर- ग्रामीणमध्ये सध्या एकही खासगी केंद्र सुरू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २३ लाख व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यास अडचणी आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.