Read Latest & Breaking corona impact Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona impact along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३२ लाख २६ हजार जणांनी पहिला तर २३ लाख ५६ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चौथ्या लाटेची शक्यता धूसरच असून प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एक हजार ५२६ रुग्ण असून सातारा, सांगली, नंदूरबार, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.
बार्शी, पंढरपूर व मंगळवेढ्यात प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात ७ एप्रिलपासून एकही रुग्ण आढळला नसून शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.
शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर ग्रामीणमधील काही तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून सध्या बार्शी, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे चार तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांपाठोपाठ आता सोलापूर शहर कोरोनामुक्त झाले आहे. बुधवारी (ता. 16) सलग सातव्या दिवशी शहरात एकही रुग्ण आढळला नाही
नातेसंबंध विसरायला भाग पाडून या जगात खरचं कोण कोणाचा आहे, याची प्रचिती त्याने सर्वांनाच करून दिली. अनेक चिमुकल्यांना वडिल समजण्यापूर्वीच त्या वडीलाचा बळी घेतला. स्मशानभूमीदेखील गहिवरली, अशी स्थिती करून ठेवली होती. मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे.
तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरल्याची स्थिती आहे. मागील तीन दिवसांत शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे ग्रामीणमधील रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या शहरात तीन तर ग्रामीणमध्ये 64 सक्रिय रुग्ण आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.