राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे
सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
बार्शी, पंढरपूर व मंगळवेढ्यात प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात ७ एप्रिलपासून एकही रुग्ण आढळला नसून शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
१८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर (संरक्षित) डोस मिळणार असून त्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, शहर- ग्रामीणमध्ये सध्या एकही खासगी केंद्र सुरू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २३ लाख व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यास अडचणी आहेत.
आतापर्यंत राज्यातील सात कोटी 49 लाख व्यक्ती दोन्ही डोस घेऊन कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत. लसीचा इफेक्ट नऊ ते दहा महिन्यांपर्यंत असून दोन डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने पूर्ण झालेत, त्यांनी बुस्टर (संरक्षित) डोस घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
‘मला गेल्या वीस वर्षांपासून मधुमेह आहे. हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलाय. कोरोनाची अक्षरशः भीती वाटतेय. त्यामुळे मी घराबाहेरही पडत नाही. मला कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घ्यायचाय.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.