बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आता लाचखोरही अत्याधुनिक झाले आहेत. ‘सीडीआर’च्या (कॉल डिटेल्स रिपोर्ट) माध्यमातून आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून अनेकजण समोरील व्यक्तीला विशेषत: त्यांच्या हस्तकाला व्हॉट्सॲप कॉलवरच बोलतात, अशी स्थिती आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे.
गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यावेळी उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
शहरातील सर्वच भागात पेट्रोलिंग करावे, अशी स्ट्रिक्ट पोलिसिंग मला हवीय, अशा सक्त सूचना पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाला फाईट करत करतच ऑपरेशन परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली. त्यातून ८३६ जणांचे कायमचे परिवर्तन झाले आहे. कला असूनही परिस्थितीमुळे हातभट्टी दारू गाळणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून आता परिवर्तनाचा ‘बंजारा’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
पोलिस आयुक्त हरीश बैजल हे उद्या (मंगळवारी) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर पुण्यातील सीआयडीचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जूनमध्ये होतात. पण, बैजल हे मंगळवारी सेवानिवृत्त होत असल्याने हिरमेठ हे तात्पुरत्या स्वरुपात पदभार सांभाळतील.
जिल्ह्याला हातभट्टी दारूमुक्त करण्याच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत आज (शनिवारी) उद्योजक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत दुसरा रोजगार मेळावा पार पडला. ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या.
बालविवाहात सोलापूर राज्यात अव्वल असून, ही ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन ‘परिवर्तन’ ऑपरेशन हाती घेतले आहे. तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले, अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे.
ठळक बाबी...
- चॅप्टर केसमधील हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले पाचशे रुपये
- सोमवारी (ता. ९) भेटायला बोलावले आणि आज पाचशे रुपये घेऊन येण्यास सांगितले
- हजेरीची स्वाक्षरी करून पाचशे रुपये वहित ठेवायला सांगितले
- ३६ वर्षीय सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नाना शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात
कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली. दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली.
विणकर गणपतीजवळील उषा कंटीकर यांच्या घरातून त्यांच्या मुलीचे अडीच लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले होते. पण, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी चोरीचा घटनाक्रम समजून घेतला आणि त्यांनी शक्कल लढविली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरट्याने ते दागिने कंटीकर यांच्या घरासमोर आणून टाकले होते.
ॲट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केले आहे. यासंदर्भात स्वत: साळुंखे यांनीही आपल्या निलंबनाचे तेच कारण असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा करणे या पलिकडेही पोलिसांचे काम असते, हे सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सामाजिक बांधिलकीतून ते दाखवून दिले आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन परिवर्तन’ पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविले. त्यातून त्यांनी त्या लोकांचे समुपदेशन व पुनर्वसन केले. १८ महिन्यात ६०४ जणांनी तो व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोकसभेत केले.
ज्यांचा गुन्ह्यांच्या तपासाशी कधीच संबंध आला नाही, त्या पोलिस अंमलदारांना तपास कामात सहभागी करून घेण्यासाठी प्रशिक्षण दिले. आता जवळपास 300 नवीन तपास अधिकारी ग्रामीण पोलिस दलात वाढल्याने गुन्ह्यांची निर्गती वाढली असून पेन्डन्सीही 25 टक्कक्यांपेक्षाही कमी झाली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' सुरु केले. कारवाई करतानाच दुसरीकडे प्रबोधनावरही त्यांनी भर दिला. गुन्हेगारीचा अंत शेवटी वाईटच असतो, हे उदाहरणासह त्या कुटुंबातील तरुणांना व महिलांना पटवून दिले. त्यातून त्यांचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी हा व्यवसाय सोडण्याचा निर्धार केला. आता हातभट्टी दारु तयार करणारे हात समाजमान्य व्यवसायाकडे वळल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातभट्टी दारू निर्मिती अशी ओळख असलेला मुळेगाव तांडा आता उद्योगगाव म्हणून नावारुपाला येऊ लागला आहे.
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहाजणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली आहे. त्यावेळीच पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.