राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. परंतु इथेनॉलच्या देशांतर्गत उत्पादनामुळे २०२२ मध्ये इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ३० हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत होणार आहे.
गेल्या वर्षी केंद्राने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवले होते. त्याचप्रमाणे, २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्टही ठेवले होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.