महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक महत्वाचे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक राज्य मानले जाते. महाराष्ट्र राज्याच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेल्या आहेत. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई राज्याची राझधानी तर नागपूर उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.