Minister Varsha Gaikwad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Varsha Gaikwad

Read Latest & Breaking Minister Varsha Gaikwad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Minister Varsha Gaikwad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गुणवत्तेची चिंता! कोरोनामुळे अंगणवाड्यातील ८० हजार चिमुकली थेट पहिली-दुसरीत
कोरोनामुळे मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. तीन वर्षांत त्या वर्गातील मुले केवळ ६० दिवसच शाळेत गेली. बहुतेक मुले शिक्षणापासून दूरच राहिली. घराजवळील अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेली चिमुकली आता थेट पहिली, दुसरीच्या शाळेत गेली आहेत.
यंदा ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ धोरण राबविणार
उपक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; ‘मिशन झीरो ड्रॉप आउट मोहीम
११वी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून! १८ जुलैपासून सुरु होणार महाविद्यालये
मागील काही वर्षांत बहुतेक मुलांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडे असल्याने कला शाखेच्या अनेक तुकड्या बंद पडल्या आहेत. ग्रामीण तथा तालुक्याच्या ठिकाणच्या महाविद्यालयांना एटीकेटीचे विद्यार्थी घेऊन तुकडीची पटसंख्या पूर्ण करावी लागत आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी
शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून, शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरते. मात्र, शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई! मुख्याध्यापकासह १६ शिक्षकांची एक दिवसाची पगार कापली
पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील लेटकमर शिक्षक व वार्षिक नियोजन नाही, पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली, परिसर अस्वच्छता, अशा कारणांमुळे एका मुख्याध्यापकासह १५ शिक्षकांची एक दिवसांची पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.
३ विषयांत नापास विद्यार्थ्यांनाही अकरावीला प्रवेश! सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात
विज्ञान व वाणिज्य शाखेची इयत्ता अकरावीची प्रवेश क्षमता ५५ हजार ५०० इतकी असल्याने यावर्षी सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या शाखेतून प्रवेश मिळणार आहे.
आजपासून शाळांची वाजणार घंटा! सकाळी दहा ते सव्वापाचपर्यंत शाळांची वेळ
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा उद्या (बुधवारी) वाजणार आहे. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
पहिली ते चौथीचे शिक्षकांना घ्यावे लागणार ज्यादा तास! लेखन, वाचन, आकडेमोडीचा होणार सराव
कोरोनामुळे सलग दोन वर्षे (२३ महिने) शाळा विशेषत: पहिली ते चौथीचे वर्ग पूर्णत: बंद राहिले. त्या मुलांना ऑनलाइन शिक्षणदेखील समजले नाही आणि घरीही त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास केला नाही.
बालमजुरी करणारा ‘तो’ म्हणाला..! आई आजारी आहे, बहिण लग्नाला आलीय काम करावे लागते
कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, घरात आई आजारी आहे, बहिण लग्नाला आली आहे, तिला चांगला पती मिळावा, विवाहातील सर्व वस्तू देता याव्यात, पालकांना हातभार लागेल म्हणून मला काम करावे लागत असल्याची ह्दयद्रावक कहाणी एका चायनिज गाड्यावर काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सांगितली.
शाळा सुरु होण्यापूर्वी वर्गखोल्यांची सॅनिटायझर फवारणी अन्‌ स्वच्छता बंधनकारक
जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत; पण पहिल्या दोन दिवसांत शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन शाळांची संपूर्ण स्वच्छता व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारायचे आहे. १५ जूनपासून मुलांना शाळेत बोलावले जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके द्यायची आहेत.
कमी होणार शाळेची वेळ! विज्ञान, गणित, इंग्रजी विषयांवर राहणार भर
शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा बंद न ठेवता १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तर पावसाळ्याचे दिवस आणि कोरोनावाढीमुळे शाळेची वेळ कमी करून विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांवरच सर्वाधिक फोकस केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात पुन्हा मास्कसक्ती? मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
महाराष्ट्र
राज्यात काल जवळपास दीड हजारांच्या जवळ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती.
शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड
महाराष्ट्र
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
‘खबरदारी घेऊनच शाळा सुरू करणार’
महाराष्ट्र
शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल
मुलांना सांगता येईना देशाचा स्वातंत्र्यदिन! शिक्षकांना आता शाळेत मोबाईल बंदी
solapur
पहिली ते पाचवीतील मुलांना अजूनही देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो, हे सुद्धा सांगता येत नसल्याची स्थिती आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढून सर्व विद्यार्थी स्पर्धाक्षम बनावेत, या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा तयार केला आहे.
बारावीचा निकाल ७ जूनला? चित्रकलेच्या गुणांमुळे लांबणार दहावीचा निकाल
solapur
७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा ठरला फॉर्म्युला! ग्रामविकासने काढला ‘हा’ आदेश
solapur
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने एक आदेश काढला आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची रिक्त पदे १० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत, त्यांच्यासह दहा टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही आंतरजिल्हा बदलीत सहभागी करून घेतले जाणार आहे.
विद्यापीठाची १५ जूनपासून ऑफलाइन परीक्षा! लिखाणाचा सराव मोडल्याने गुणवत्तेची कसोटी
solapur
कोरोना काळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. त्यात सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) होते. एका तासात त्यांना तो पेपर सोडवावा लागला. त्यानंतर शिक्षणही ऑनलाइन मिळाले. लिखाणाचा सराव मोडलेल्या विद्यार्थ्यांना आता दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा द्यावी लागत आहे.
go to top