१५ अपक्ष आमदारांच्या निर्णायक मतांवर महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार संजय शिंदे आणि राजेंद्र राऊत यांना महत्त्व आले आहे.
केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर तत्कालीन फडणवीस सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. दरवर्षी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वाकोटींपर्यंत निधी मिळत होता. पण, मागील पावणेतीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने एकाही आमदारास त्या योजनेतून निधी दिलेला नाही. त्यामुळे ही योजना गुंडळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये अदलाबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व युवक अध्यक्षाची संधी इतरांना मिळू शकते.
सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून इच्छुकांचा अंदाज घेऊन उमेदवारी निश्चित केली जात आहे. सोलापूर महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतील.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.