बेशिस्त वाहनचालकांकडून एप्रिल २०२१ ते २२ मे २०२२पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी तब्बल १५ कोटींचा दंड वसूल केला आहे. तीन लाखांहून अधिक वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियम मोडला आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.