शिवसेनेच्या निष्ठावान नेत्यांपैकी एक नाव म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे भारतीय राजकारणी असून, व्यवसायाने ते एक पत्रकारही आहेत. राज्यसभेत शिवसेनेकडून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकही ते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पक्षातील त्यांची कारकीर्द विशेष अशी राहिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. शिवसेनेचा माध्यमातील प्रमुख चेहरा म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 2004 मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून आले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 2005 ते 2009 यादरम्यान गृह कामकाज समितीचे सदस्यही ते राहिले आहेत. त्यानंतर 2010 मध्ये राज्यसभेवर त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.