Read Latest & Breaking Shambhuraj Desai Marathi News. Get Trending & Top News Headlines on Shambhuraj Desai along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
भाजपनेही सरकार अल्पमतात असून अविश्वास ठराव पारित करून बहुमत सिध्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या १०५ आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे आगामी ती-चार दिवसांत राज्यात सत्तापालट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आम्ही सरकारचे नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, अशी भूमिका जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. स्व. बाळासाहेबांनी सांगितले होते, ‘माझ्या मागे उद्धव अन् आदित्यला सांभाळा’, याची आठवणही त्यांनी सांगितली.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनविलेल्या ‘सीएमआयएस’ प्रणालीमुळे कोणत्याही क्षणी संशयित आरोपीचा केवळ फोटो घेऊन अपलोड केल्यास त्याची संपूर्ण पार्श्वभूमीच समोर येते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेणे सोयीस्कर झाले आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाला फाईट करत करतच ऑपरेशन परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली. त्यातून ८३६ जणांचे कायमचे परिवर्तन झाले आहे. कला असूनही परिस्थितीमुळे हातभट्टी दारू गाळणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून आता परिवर्तनाचा ‘बंजारा’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
बालविवाहात सोलापूर राज्यात अव्वल असून, ही ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन ‘परिवर्तन’ ऑपरेशन हाती घेतले आहे. तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले, अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे.
मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसांनी तर ग्रामीणमधील काही कार्यकर्त्यांना संबंधित पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नेत्यांच्या सांगण्यावरून कोणतेही प्रक्षोभक वर्तन, भाषण, घोषणाबाजी किंवा गैरकृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यातून स्पष्ट केले आहे. या नोटिशीनुसार संबंधिताला किमान सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.
ॲट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केले आहे. यासंदर्भात स्वत: साळुंखे यांनीही आपल्या निलंबनाचे तेच कारण असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.