काँग्रेसची दिसणारी अडचण काय तर, निवडणूक लोकसभेची असो की निरनिराळ्या राज्यांतील विधानसभांची, पुरेसे उमेदवार निवडून येत नाहीत. तसे ते येत नाहीत म्हणून सत्ता मिळत नाही.
श्रीलंकेतील आर्थिक संकट राजपक्षे घराण्याच्या सत्तेनं ओढवून घेतलं आहे. कोरोनाच्या लाटांनी जगभरातील अर्थव्यवस्थांना झटका दिला हे खरं आहे. त्याचा परिणाम श्रीलंकेतही झाला.
पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरच्या घडामोडी काँग्रेसच्या वाटचालीपुढचं गंभीर संकट दाखवत आहेत. सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाची वाटचाल सातत्यानं घसरणीकडं चालली आहे.
युरोपीय महासंघ एकत्रितपणे रशियाच्या आव्हानाचा विचार करतो आहे. जर्मनी स्पष्टपणे शस्त्रसज्ज होऊ पाहतो आहे. फिनलंडसारख्या तटस्थ देशात निदान नाटो-सदस्यत्वावर बोललं जाऊ लागलं आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन आल्यानंतर त्यांनी, प्रसंगी अमेरिकेवर विश्वास ठेवणाऱ्या घटकांचं काहीही होवो, अमेरिकेचं हित पहिलं. हे धोरण ठेवत अफगाणिस्तानातून माघार घेणं पसंत केलं.
देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर केवळ आणि केवळ निवडणुका जिंकणं हेच ध्येय असल्यासारखी वर्तणूक सुरू झाली तर काय होऊ शकतं, याचा नमुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पेश केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अलीकडं भाजपवाल्यांमध्ये भलताच उमाळा दिसतो आहे. समाजमाध्यमांवर तर ते जणू भाजपचे नेते आणि हिंदुत्ववादाचे आयकॉन असावेत असाच माहौल सजवला जातो.
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर. यांतील प्रत्येक राज्याचं वेगळं महत्त्व आहे. मात्र, उत्तर प्रदेशचं महत्त्व सर्वात अधिक.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.