Read Latest & Breaking solapur city Marathi News. Get Trending & Top News Headlines on solapur city along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
सहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार शहरातील जवळपास दीड लाख मिळकतदारांना वाढीव कराची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर ज्यांचा आक्षेप किंवा तक्रारी असतील, त्यांना २१ दिवसांची मुदत देऊन सुनावणीअंति टॅक्स रक्कम अंतिम केली जाणार होती. पण, ९० टक्क्यांहून अधिक मिळकतदारांच्या तक्रारी येतील आणि त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यासाठी किमान दोन-तीन महिने लागतील. तोपर्यंत टॅक्स जमा न झाल्या प्रशासन चालविणे मुश्किल होईल, याची भीती होती.
पावसाळ्यात शहरातील घरांची पडझड, कुठे पाणी साचले किंवा घरात पाणी साचले, अशा काही आपत्ती आल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून महापालिकेच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी पती हणमंतु चणप्पा गोटे (रा. जेऊर, ता. अक्कलकोट) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे
शहरातील एक लाख २९ हजार मिळकतदारांना मालमत्ता कराची नोटीस काढण्यात आली आहे. पूर्वी चार हजारांचा कर भरावा लागत होता, आता त्याच मिळकतदाराला १२ हजारांची पावती आली आहे. घरमालकाने पूर्वी भाडेकरार करताना चार ते १२ हजारांपर्यंत भाडे निश्चित केले आहे. पण, आता महापालिकेच्या करवाढीनंतर भाडेकरार नव्याने होतील, अशी स्थिती आहे.
शेळगी येथील मित्र नगरात राहणाऱ्या मालनबी हसनसाब नदाफ (वय ७०) यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलीम जहाँगीर नदाफ (वय २५)असे त्या नातवाचे नाव असून जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.