पीएफएमएस (पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीतून शाळा व्यवस्थापन समित्यांना निधी वितरीत करण्याची अट घालण्यात आली. त्या प्रणालीतून पैसे पाठविण्यास बॅंकांना अडचणी येत असल्याने शाळा सुरु होऊन २० दिवस झाले, तरीपण राज्यातील एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नाही.
यंदा जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी (१३ जून) गणवेश मिळावा, असे शासनाचे आदेश आहेत. गणवेशाचा निधी प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन समितीला निधी देणे अपेक्षित आहे. पण, मागील आठ-नऊ दिवसांत तो निधी मिळाला नसल्याने आता अवघ्या ३० दिवसांत सर्व गणवेशाचे कापड व रंग ठरवून त्याची शिलाई करून घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समित्यांसमोर आहे.
नागपूर जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा शिक्षण समिती व अर्थ सभापती भारती पाटील यांनी केली होती.
समग्र शिक्षा अंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरुन शालेय गणवेश उपलब्ध करुन देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.