Read Latest & Breaking weekly horoscope Marathi News. Get Trending & Top News Headlines on weekly horoscope along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
आपली ग्रहमाला हा एक गतीचा खेळ आहे, त्यामुळेच माणसाचं जीवन हे गतीशीच संबंधित आहे. माणसाची जीवनातली वाटचाल ही जशी जमिनीवरील गती आहे, तशीच ती एक सद्गती किंवा दुर्गतीसुद्धा आहे.
गायत्री आणि सावित्री या महाशक्ती मानवी जीवनाच्या अव्यभिचारी भक्तीच्या अंतरंगातील मोठे भावस्पंदनच म्हणावे लागतील. संसार हाच मुळी एक वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष अनंतकोटी ब्रह्मांडनायकाचाच आहे.
शरीरविज्ञान आणि मनोविज्ञान यांची सांगड घालत अर्थातच आचार, विचार आणि उच्चार यांचा संदर्भ घेत माणसाच्या तथाकथित जीवनाचं मूल्यमापन म्हणा किंवा चक्क रोगनिदान म्हणा, करणारा माणूस सध्याच्या कलियुगात स्वतः घोर अज्ञानात वावरत असूनही, ‘मला शहाणपणा शिकवू नकोस,’ मला असाच अज्ञानात राहू दे, असंच सतत म्हणत असतो! म्हणूनच समर्थांना दासबोधात मूर्ख लक्षणाचा समास लिहावा लागला! असो.
जग हे सूर्याभोवती फिरतंय हे निर्विवाद! किंबहुना जग हे प्रकाशाभोवती फिरतंय हेसुद्धा पूर्णसत्य आहे! त्यामुळंच या जगात प्रकाश आणि गती याशिवाय काहीही नाही!
काळ हा अनंत आहे. किंबहुना काळ हा अनंताच्या पोटात जगत असतो आणि याच काळाच्या पोटी जन्माला येत माणूस देह धारण करत असतो म्हणा किंवा हे देहरूपी भांडवल घेऊन तो संसाराचा धंदा करतो.
अधिक आणि उणे या दोन शब्दांत पृथ्वीवरील जीवांचं जगण्याचं जीवनगणित सामावलं आहे. सुख आणि दुःख या भावना म्हणा, किंवा संकल्पना म्हणा, एकमेकांचा आश्रय घेऊनच जगत असतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.