पौर्णिमेचं जसं महत्त्व आहे, तसंच अष्टमीचंही एक महत्त्व आहे. अष्टमी हा एक योग आहे, किंबहुना ती एक योगशक्ती आहे. शुक्ल पक्षातील किंवा कृष्ण पक्षातील चंद्रकला ही सारखीच असते.
द्या वा, पृथ्वी आणि अंतरिक्ष यातून अर्थातच स्थूलसूक्ष्मातून या विश्वाचा अद्भूत प्रपंच क्षणोक्षणी चालू असतो. सूर्यलोक, नक्षत्रलोक आणि धृवलोक असा हा स्थूलसूक्ष्मातील त्रिगुणात्मक भावप्रपंच भगवंत खेळत असतो असंच म्हणावं लागेल.
आपली ग्रहमाला हा एक गतीचा खेळ आहे, त्यामुळेच माणसाचं जीवन हे गतीशीच संबंधित आहे. माणसाची जीवनातली वाटचाल ही जशी जमिनीवरील गती आहे, तशीच ती एक सद्गती किंवा दुर्गतीसुद्धा आहे.
गायत्री आणि सावित्री या महाशक्ती मानवी जीवनाच्या अव्यभिचारी भक्तीच्या अंतरंगातील मोठे भावस्पंदनच म्हणावे लागतील. संसार हाच मुळी एक वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष अनंतकोटी ब्रह्मांडनायकाचाच आहे.
शरीरविज्ञान आणि मनोविज्ञान यांची सांगड घालत अर्थातच आचार, विचार आणि उच्चार यांचा संदर्भ घेत माणसाच्या तथाकथित जीवनाचं मूल्यमापन म्हणा किंवा चक्क रोगनिदान म्हणा, करणारा माणूस सध्याच्या कलियुगात स्वतः घोर अज्ञानात वावरत असूनही, ‘मला शहाणपणा शिकवू नकोस,’ मला असाच अज्ञानात राहू दे, असंच सतत म्हणत असतो! म्हणूनच समर्थांना दासबोधात मूर्ख लक्षणाचा समास लिहावा लागला! असो.
मनुष्यलोक हा सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची एक सरसकट विचित्र भेसळ होऊन आविष्कृत होत असतो. अर्थातच, रजोगुणाची नाळ पकडून जन्माला आलेला हा मनुष्यप्राणी जन्म-मृत्यूच्या क्षणांचाही सोयर-सुतकाच्या माध्यमातून विटाळ पाळत असतो!
ज्योतिष हे शिवस्वरोदय आहे. अर्थातच त्याचा श्वासाशी संबंध आहे. कारण माणसाचा पहिला श्वास हीच त्याची खरी जन्मवेळ असते! पृथ्वी हा एक श्वासच आहे आणि हा श्वास सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो.
सुख-दुःखाच्या आंदोलनांतून सतत आंदोलित होणारं किंवा राहणारं हे मनुष्याचं प्राकृत जीवन सतत एक मनाचा एक अदृश्य तराजू घेऊन प्रपंचाच्या मंडईत वावरत असते म्हणा किंवा भिरभिरत असतं म्हणा !
श्री गणेश हे कर्ता, धर्ता आणि हर्ता असे तिन्ही आहेत. ‘गॅं’ हे गतिबीज आहे. आकाशस्थ गती हा अर्थातच एक शक्तीचा खेळ आहे. श्रीगणेश हे सर्व शक्तींच्या मूलाधाराशी वसले आहेत.
माणूस ही एक साधना आहे. संसाराच्या काळरूपी पिंजऱ्यातील दांडीला घट्ट पकडून बसलेला हा माणूस नावाचा पोपट सतत सुखाच्या आभासातून बंधनात असूनही व्यर्थ पोपटपंची करत असतो!
माणसाचं मन, शरीर आणि प्राण हे स्वस्थ कधीच नसतात. मनाचं देणं-घेणं, शरीराचं धरणं-सोडणं आणि प्राणाचं (श्वासाचं) उत्सर्जन आणि विसर्जन या क्रिया सतत चालूच असतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.