हिवाळी पर्यटनाचा विचार करताय? 'हे' आहेत हॉट - स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

हिवाळी पर्यटनासाठी केरळ, गोवा, साऊथ ईस्ट एशियाकडे अनेकांचा कल आहे. नोव्हेंबर सुट्टीच्या तुलनेत डिसेंबरच्या सुट्टीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.  

मुंबई : हिवाळी सुट्टीमध्ये पर्यटनासाठी केरळ, गोवा तर परदेशात साऊथ ईस्ट एशिया, दुबई नेपाळ या ठिकाणांकडे पर्यटकांचा ओढा आहे. या स्थळांचे बुकींग पर्यटन कंपन्यांकडे डिसेंबर महिन्यासाठी झाले असून सर्वाधिक बुकींग डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यासाठी आहे. 

 

मंदीमुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्यटनासाठी पर्यनटाकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता डिसेंबर सुट्टी दरम्यान ही परिस्थिती बदलली असून पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले.

भारतातमध्ये गोवा आणि केरळ ही डेस्टिनेशन ख्रिस्मस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्याबरोबर सिक्कीम, गंगटोक, अंदमान- निकोबार या ईशान्य भारतातील ठिकाणांना लोक पर्यटनासाठी डिसेंबरमध्ये जात आहे.

तर परदेशात साउथ ईस्ट एशिया, नेपाळ, बाली, श्रीलंका, फुकेत, रशिया, पॅरिस, दुबई येथे पर्यटकांचा ओढा आहे.

 

 

डिसेंबर सुट्टी तीन ते चार दिवस शॉर्ट टूर्स तर जास्तीत जास्त एक आठवड्याचे बुकींग पर्यटक करत आहेत. नोव्हेंबर पेक्षा चांगला प्रतिसाद डिसेंबर बुकींगसाठी मिळतोय. तरी प्री बुकींग पेक्षा आयत्या वेळी बुकींग होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे राजा-राणी ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक विश्वजीत पाटील यांनी सांगितले. 

वाढत्या विमान दराचा परिणाम नाही 

जेथे जेथे विमान सेवा उपलब्ध होतात तेथे पर्यटकांचा जाण्याचा कल वाढतो. त्यामुळेच बाली, नेपाळ, रशिया यांसाख्या ठिकाणी पर्यटकांचे बुकींग वाढले. विमानाचे दर जास्त असले पर्यटक आधी बुकींग करत असल्याने ते स्वस्त पडतात. जर आयत्यावेळी बुकींग केले तरी जास्ती पैसे मोजून पर्यटक पर्यटनाला जात आहे. - शैलेश पाटील, संचालक, केसरी टूर्स 

विंटर काश्‍मीर बुकींग सुरू

कलम 370 लागू झाल्यानंतर काश्‍मीरमधील पर्यटन पूर्णतः थांबले होते. पण आता काश्‍मीरमधील पर्यटन पुन्हा सुरळीत सुरू करण्यावर तेथील टुरिझम बोर्ड भर देत आहे. त्यानुसार डिसेंबरपासून काश्‍मिरमध्ये टूर्स नेण्यात येणार आहे. त्याचे बुकींग सुरू केले आहे, असे विश्‍वजीत पाटील यांनी सांगितले.  

Webtitle : planning winter vacation this is your complete guide for winter holidays


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: planning winter vacation this is your complete guide for winter holidays