नाव सह्याद्री, चिकाटी तर असणारच; 4 वर्षांच्या चिमुकलीने सर केला लिंगाणा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

सह्याद्री महेश भुजबळ असे तिचे नाव. तिच्या वडिलांनी ती 11 महिन्यांची असल्यापासून गड किल्यांची माहिती तिला दिली. आतापर्यंत सह्याद्रीने रायगड, सिंहगड, मल्हारगड, तुंग, प्रतापगड अशा 13 गडकिल्यांची भटकंती केली आहे. त्यामुळे हा सुळका तिने आत्मविश्वासाने सर केला.

पुणे : लिंगाणा....नुसतं नाव ऐकलं तरी भल्याभल्यांची बोबडी वळते. रायगडाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वानेच भय दाखवणारा,
 2969 फुटांचा असा कठीण श्रेणीतला सुळका अवघ्या 4 वर्षाच्या सह्याद्रीने सर केला आहे. सर्वात लहान वयात लिंगाणा सुळका सर करणारी ती विक्रमवीर ठरली आहे.

 भटकंतीचा 'सुवर्ण त्रिकोण'
 

सह्याद्री महेश भुजबळ असे तिचे नाव. तिच्या वडिलांनी ती 11 महिन्यांची असल्यापासून गड किल्यांची माहिती तिला दिली. आतापर्यंत सह्याद्रीने रायगड, सिंहगड, मल्हारगड, तुंग, प्रतापगड अशा 13 गडकिल्यांची भटकंती केली आहे. त्यामुळे हा सुळका तिने आत्मविश्वासाने सर केला.

चलो, बॅग उठाओ और निकल पडो

Image may contain: 6 people, people smiling, mountain, child, outdoor and nature

लिंगाणा सुळका सर करण्यासाठी आरोहन साहित्य अन् त्या गोष्टींची तयारी असावी लागते. सह्याद्रीने शिलेदार अॅडव्हेन्चर इंडिया या गृपसह सागर नलावडे आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण तयारी केली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी गड किल्यांचे संरक्षणचा संदेश देण्यासाठी तिने सह्याद्रीने सुळका सर करण्याचे ठरविले.

Video : संस्कृती, सौंदर्याने नटलेले लेह-लडाख!

Image may contain: 12 people, people smiling, people standing and outdoor

लिंगाण्याला दोरखंड लावून सुळका चढण्यास तिने सुरवात केली. सह्याद्री नावाप्रमाणेच जिद्द, चिकाटी अन् आत्मविश्वासाने तिने हा सुळका सर केला. किल्ले लिंगाण्यावर पोहचल्यावर सह्याद्रीने शिवछत्रपतीं शिवाजी महाराज की जय अशी घोषना देत आनंद व्यक्त केला. 

गोव्याच्या पुढं कर्नाटकही आहे, टुरिझमचा उत्तम ऑप्शन!

Image may contain: 6 people, people smiling, people standing and outdoor

मोहिमेतील अजून खास झाली ती मिथिलेश गणेश मगर (वय - 6 वर्ष) अन् अखिलेश गणेश मगर (वय - 7 वर्ष) या उत्सहाने भरलेल्या चिमुकल्यामुळे. एवढ्या कमी वयात 29 किल्ल्याची भटकंती केलेली ही जोडी 30 वा किल्ला लिंगाणा आरोहनासाठी सहभागी झाले होते. 5 वर्षांचा अनय तर लिंगाण्याला एखाद्या क्लायंबरप्रमाणे भिडला तर, 8 वर्षांचा वंदन याने सुद्धा या खडतर मोहिमेत सहभाग घेतला. 

वासोट्याचा धम्माल नाइट ट्रेक...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 4 year old Girl Sahyadri Bhujbal Completed Lingana Fort Trek