पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग...

टीम ई-सकाळ
Saturday, 16 November 2019

- हिंजवडीपासून फक्त 17 किलोमीटरवर आहे कासारसाई धरण
- भूमकर चौकापासून फक्त अर्ध्यातासावर 
- कासारसाई धरणामध्ये बोटींगचीही सुविधा

पुणे : पावसाळा संपलाय, सगळी सृष्टी आता सोनकीच्या फुलांनी सजली आहे.  अशा वेळी शनिवार-रविवार आला की पुणेकरांचे पाय सह्याद्रीच्या दिशेने निघतात. मात्र, एवढा लांब प्रवास करायचा नसेल तरीही सह्याद्रीची मजा लुटायची आहे तर हिंजवडीजवळ अर्ध्यातासावरच ही मजा लुटता येऊ शकते. 

Related image

खोटं वाटतंय? पण हे खरं आहे. हिंजवडीपासून फक्त 17 किमी अंतरावर असलेल्या कासारसाई धरणावर पुणेकरांना हा अनुभव घेता येईल. भूमकर चौकातून कासारसाई धरणावर पोहोचायला फक्त अर्धातास लागते. इथे असलेल्या पुलावर उभं राहून सूर्यास्त पाहण्याची मजाच वेगळी आहे. 

Image result for kasarsai dam

कासाईसाईला जाण्याचा रस्ता मात्र खराब आहे. दुचाकी आणि चारचाकी शेवटपर्यंत जातात. इथे जाताना फक्त सोबत खाण्यासाठी आणि पाणी घेऊन जा. कारण, इथे खाण्यासाठी फक्त एकच दुकान आहे. कासारसाई धरणामध्ये बोटींगचीही सुविधा आहे त्याचा नक्की आनंद घ्या.

Image result for kasarsai dam

तुम्हाला जर गर्दी टाळून हटके ठिकाणी जायचं असेल तर कासारसाई बेस्ट पर्याय आहे.  

कसे जाल?
हिंडवडी फेज 2- भारतीय टपाल कार्यालय- बॅक ऑफ महाराष्ट्र- HP पेट्रोलपंप-आयुश्री हॉस्पिटल-IDBI बॅक-कासारसाई धरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars get ready to explore Kasarsai Dam just 17 kms away from Hinjewadi