तुमच्याही एखाद्या जबरदस्त क्लिकला मिळेल अवॉर्ड; 'ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द ईयर' घ्या सहभाग!

टीम ई-सकाळ
Friday, 17 January 2020

प्रत्येक विषयातील प्रत्येकी चार छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविता येणार आहेत. निवडक फोटोंचे प्रदर्शन सकाळ हॉलिडे कार्निवलमध्ये लावण्यात येणार आहे. 

पुणे : पर्यटनाविषयी पर्यटकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ म्हणजे सकाळ हॉलिडे कार्निवल होत आहे. सकाळ हॉलिडे कार्निव्हल पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स असून सहप्रायोजक MFW Travels हे आहेत.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटन करताना काढलेल्या तुमच्या फोटोंना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने "सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इअर : 2020' ही स्पर्धा आयोजिली आहे. या स्पर्धेला ट्रॅव्हलॉर कंपनीचे संदीप देसाई यांचे सहकार्य लाभले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. यामध्ये तुम्ही काढलेले फोटो दाखल करू शकता. त्यामध्ये 
1) Landscape, 
2) Street and People, 
3) Dusk to Dawn व 
4) Structures यांचा समावेश आहे.

वरील प्रत्येक विषयातील प्रत्येकी चार छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविता येणार आहेत. निवडक फोटोंचे प्रदर्शन सकाळ हॉलिडे कार्निवल मध्ये 24, 25, 26 जानेवारी 2020 ला पंडित फार्म, डीपी रोड, पुणे येथे प्रदर्शित केले जाईल. अंतिम 13 स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक दिले जाईल.

Image may contain: text that says "SAKAL HOLIDAY CARNIVAL TRAVEL PHOTOGRAPHY FOOD 24- 24-25-26 JAN 2020 VENUE : PANDIT FARMS, DP ROAD, PUNE"

ट्रॅव्हल टुरिझमशी संबंधित बातम्या, लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फोटो पाठविण्याची शेवटची तारिख : 18 जानेवारी 2020
फोटो पाठविण्यासाठी वेबसाईट travel.esakal.com

सकाळ हॉलिडे कार्निवल बद्दल :

  • प्रदर्शनात 40 हून अधिक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स. 
  • पर्यटनाचे विविध पर्याय एकाच छताखाली
  • कुटुंबासह येऊन टूर बुक करण्याचे ठिकाण..
  • कुठे : पंडित फार्म, डीपी रोड, पुणे
  • कधी : 24, 25, 26 जानेवारी 2020
  • वेळ : सकाळी 11 ते संध्याकाळी 9 पर्यंत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal travel photography competition at holiday carnival 2020 pune