गोव्याला जाण्यापूर्वी तुम्हाला 'हे' पंधरा नियम वाचलेच पाहिजेत!

टीम ई-सकाळ
Tuesday, 24 December 2019

गोव्याला जाणार असाल, तर हे नियम जरूर वाचा.

पणजी : ख्रिसमस, न्यू इयर एन्ड म्हटलं की गोव्यात टुरिस्टची अक्षरश: झुंबड उडते. विशेषतः महाराष्ट्रतून, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्याला जातात. पण, या पर्यटकांचा गोव्यात अनेकदा गोंधळ उडतो. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. तिथले नियम, आणि कायदे थोडे वेगळे आहेत. त्यामुळं गोव्याला जाण्यापूर्वी ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टुरिझम विषयीच्या बातम्या वाचा ► क्लिक करा

गोव्याविषयी आणखी वाचण्यासाठी ► क्लिक करा 

गोव्याला जाण्यापूर्वी हे तुम्ही वाचलंच पाहिजे

 • किफायतशीर वाहनांमधून सुरक्षित प्रवास करावा. यासाठी नोंदणीकृत व अधिकृत वाहने भाड्याने घ्यावीत किंवा त्यामधून प्रवास करावा. जे मीटप्रमाणे पैसे घेतात, शक्यतो अशा व्यावसायिकांनाच प्राधान्य द्यावे.
 • सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान करू नये.
 • धार्मिक पर्यटन स्थळ परिसरात परंपरागत हिंदू संस्कृतीचा पोशाख परिधान करावा. शक्यतो महिलांनी व पुरुषांनी अंगभर कपडे घालावेत. अर्धनग्न किंवा तोकड्या कपड्यात धार्मिक स्थळ परिसरात प्रवेश करू नये.
 • कुठेही उघड्यावर कचरा फेकणे किंवा थुंकणे टाळावे.

Image result for goa foreign tourist

 

 • वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
 • पर्यटनास निघताना शक्यतो सुरक्षेच्या कारणास्तव जास्तीत जास्त दागिने घालणे टाळावे. तसेच स्वतःजवळ मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगू नये. एटीएम किंवा डिजिटल पेमेंट मोडचा वापर जास्तीतजास्त करावा
 • रात्री-अपरात्री समुद्र किनाऱ्यांवर किंवा अज्ञातस्थळी फिरणे टाळावे.
 • कोणाच्याही परवानगीशिवाय धार्मिक स्थळांचे, परिसराचे किंवा व्यक्तिंचे फोटो काढू नयेत.
 • Image result for goa foreign tourist

  • समुद्र किनाऱ्यावर असताना अश्लिल वाटावे असे कोणतेही कृत्य करू नये. किंवा त्याप्रमाणे, इतरांकडून वर्तन होईल असे वागू नये.
  • गोव्यात आल्यावर उघड्यावर जेवण बनविणे टाळावे.
  • स्थानिकांच्या विचारांचा, परंपरेचा आदर ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • स्वस्तातील वस्तू मिळतात म्हणून त्यांना भुलू नका, किंवा काहीशा हव्यासापोटी गैरकृत्य करू नका, फसवणूक होणार नाही या संबंधी सावधगिरी बाळगा.
  • अधिकृत व्यावसायिकांजवळच जावे. साहसी क्रीडा प्रकार हे नोंदणीकृत संस्था अथवा व्यावसायिक यांच्याकडे संपर्क साधून खेळावेत. विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नये.
  • सार्वजनिक ठिकाणी किंवा समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणे हा गुन्हा आहे. मद्य पिऊन वाहने चालवू नका.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 rules you must know while traveling to goa information in marathi