लिंगाण्यावर अनोख्या 'अल्पाईन' पद्धतीने चढाई; काय आहे अल्पाईन पद्धत?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

पिंपरी : सह्याद्री पर्वतरांगेमध्ये रायगड जिल्ह्यात असलेल्या सर्वाधिक म्हणजे 920 फूट उंचीच्या लिंगाणा सुळक्‍यावर पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरींग क्‍लबच्या पाच गिर्यारोहकांनी अल्पाईन या आधुनिक आणि नवीन पद्धतीचा वापर करत एका दिवसात यशस्वी चढाई केली. 

लिंगाणा सुळक्‍याची समुद्रसपाटीपासून 3 हजार 100 फूट इतकी उंची आहे. मात्र, त्याची प्रस्तरारोहण उंची 920 फूट इतकी आहे. माऊंट एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली क्‍लबच्या चेलुवी ढोकले (वय 14 वर्षे), ओंकार बुर्डे (वय 15 वर्षे), गौरव लंघे, धनराज साळवी यांनी मोहिमेत भाग घेतला. 

Image result for linagana

पुणे, सिंहगड, पाबे घाट मार्गे सर्व गिर्यारोहक पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील सिंगापूर, मोहरी या शेवटच्या गावी पोचले. तेथून पुढे पदभ्रमंती करत बोरट्याची नाळ उतरुन सर्व लिंगाणा सुळक्‍याच्या पायथ्याशी आले. रायलिंग पठार, लिंगाणा या खिंडीत निसर्ग देवतेची पूजा करुन सकाळी नऊ वाजता दोन चमूत चढाईला सुरुवात झाली. खिंडीत गर्दी झाडीमधील मच्छरांनी गिर्यारोहकांना हैराण केले. पुढे चढाई करताना त्यांना वाऱ्याचाही अडथळा जाणवला. पहिल्या चमूचे नेतृत्व चेलुवी हिने तर दुसऱ्या चमूचे नेतृत्व गौरव लंघे याने केले. चेलुवी हिला कृष्णा ढोकले यांनी तर गौरवला धनराज साळवी यांनी सुरक्षा दोर (बिले) पुरविण्याचे काम केले. ओंकार बुर्डे यांनी इतर मदत केली. चेलुवी हिने सर्वप्रथम चढाई पूर्ण करत माथ्यावर पोचली. त्या पाठोपाठ इतर माथ्यावर दाखल झाले. दुपारी चार वाजेपर्यंत मोहिम फत्ते झाली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सर्व गिर्यारोहकांनी दिल्या. 

सुळक्‍याच्या माथ्यावरून रायगड, कोकण दिवा, कवळ्या किल्ला, कोकण याचे विहंगम दृश्‍य दिसले. माथ्यावरून रायगडावरील जगदिश्वराचे मंदिर त्यांना स्पष्ट पाहता आले. त्यास नमस्कार करून, शिवाजी महाराजांना मनोमन वंदन करुन सर्वांनी सुळका उतरण्यास सुरवात केली. संध्याकाळी मोहरी गावात रात्रीचे जेवण करून सर्व परतीच्या प्रवासाला निघाले. 
 
काय आहे अल्पाईन पद्धत ? 
- अल्पाईन पद्धत म्हणजे कमीत कमी वेळेत, कमीत कमी साहित्य वापरून अधिकाधिक चढाई (2 ते 3 सदस्य) 
- मोहिमेत प्रत्येकी एक रोप, हर्नेस, सेल्फ अँकर, हेल्मेट, 6 क्वीक ड्रॉ, 4 स्क्रू कॅराबीनर, 3 डिसेंडर केवळ एवढ्याच साहित्याचा वापर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 mountaineers from Pimpari Chinchwad completed Lingana Expedition using Alpine method