
महाराष्ट्रातल्या ट्रेक्सची तुमची अशी बकेटलिस्ट असेलच. त्या बकेटलिस्टमध्ये आता ही नावंसुद्धा नोंदवा. आम्ही घेऊन आलोय महाराष्ट्रातले अवघड आणि हटके ट्रेक. यातले किती ट्रेक्स तुम्ही केलेत सांगा बरं?
ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिना म्हणजे गडभ्रमंती करणाऱ्यांसाठी सुकाळ. आताही तुम्ही कोणता ना कोणता ट्रेक करण्याचे ठरविले असणार. मात्र, यावेळी जरा हटके आणि सहसा कोणीही न जाणाऱ्या गडांची सफर करा. कशी? आम्ही आहोत ना. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीतील 10 हटके गडांची माहिती करुन देतो. मग चला तर यातले जे ट्रेक्स तुम्ही केले नसतील ते करायला निघा.
1. अंधारबन
नावातच कळंत की हा ट्रेक किती भारी असणार आहे. घनदाट जंगलातून वाट काढत पुण्याहून सुरवात करत आपण थेट कोकणात पोहोचतो. या ट्रेकमध्ये तब्बल चार तास उतरावे लागते. ट्रेकच्या मार्गात अनेक धबधबे आहेत. तसेच या ट्रेकमध्ये कुंडलिका व्हॅलीचा नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. हा ट्रेक फुलपाखरं आणि फुलांच्या विविध प्रकारांसाठीही प्रसिद्ध आहे.
कोठे- पुणे
ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ- जुलै-जानेवारी
2. अंजनेरी
हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनेरी हा गड प्रसिद्ध आहे. या गडावर अंजनीमातेचे जगातील एकमेव मंदिर आहे. नुकतेच या गडावर शास्त्रज्ञांना नवीन प्रकारची वनस्पती सापडली आहे. त्याला त्यांनी अंजनेरी सोपारिआ असे नाव दिले आहे. ही वनस्पती फक्त या गडावरच सापडते. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रांगेपासून 20 किमी अंतरावर हा गड आहे.
कोठे - नाशिक
ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ- जुलै-जानेवारी
3. सांधण व्हॅली
अहमदनगर म्हणजे अवघड ट्रेक्सचे दाव असे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. रतनगड, हरिश्चंद्रगड, आजोबा पर्वत, कळसूबाई शिखर, अलंग मदन कुलंग अशा गडांच्या सानिध्यात ही साडेचार किमीची सांधण व्हॅली उभा आहे. या व्हॅलीत 12ही महिने कंबरेएवढे पाणी असते. या व्हॅलीच्या टोकापर्यंत कधीच सूर्यप्रकाश पोहोतच नाही. तसेच या व्हॅलीमध्ये रॅपलिंगचा अनुभव घेता येईल. साम्रद हे या ट्रेकच्या पायथ्याचे गाव आहे.
कोठे- अहमदनगर
ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ- नोव्हेंबर-मे
4. ढाक बहिरी
ढाक हा महाराष्ट्रातील सर्वांत कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक मानला जातो. कर्जत भागात येणार हा ट्रेक अत्यंत आव्हानात्मक आहे. या ट्रेकसाठी तीन रस्ते आहेत- सांदशी, राजमाची आणि जांभीवली.
कोठे- कर्जत
ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ- जून-फेब्रुवारी
5. पट्टा
जालन्याची लढाई झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज संगमनेरला आले हाते. या लढाईमध्ये मुघलांचा पराभव झाला. शिवाजीमहारांचा मृत्यू होण्याच्या सहा महिनेआधी शिवाजी महारांनी या गडावर प्रदिर्घ आजारातून बरे होण्यासाठी एक महिनाभर आराम केला होता आणि म्हणूनच या गडाला विश्रामगड असे नाव पडले. पूर्वी या गडाला पट्टा किल्ला असे नाव होते.
कोठे- अहमदनगर-नाशिक
ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ- जून-फेब्रुवारी