
अनेक लोक देशाबाहेर फिरायला जातात आणि भारतातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांवर देखील पर्यटक गर्दी करतात पण भारत अशी देखील काही ठिकाणे आहेत जी तेवढी लोकप्रिय नाही पण अतिशय सुंदर आहेत. अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत आज खास तुमच्यासाठी.
भारतातील लोकांना पर्यटनाची भरपूर ओढ आहे. नवनवीन ठिकाणे पाहणे, तेथील संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यास सर्वच लोक उत्सुक असतात. गेल्या काही काळात पर्यटन क्षेत्र भारतात अतिशय वेगाने प्रगती करताना दिसत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुट्टी काढून परिवारासोबत छान वेळ घालवावा असे सर्वांना वाटते आणि याच कारणाने पर्यटनाची लोकप्रियता वाढली आहे. अनेक लोक देशाबाहेर फिरायला जातात आणि भारतातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांवर देखील पर्यटक गर्दी करतात पण भारत अशी देखील काही ठिकाणे आहेत जी तेवढी लोकप्रिय नाही पण अतिशय सुंदर आहेत. अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत आज खास तुमच्यासाठी.
१) पोन्मुडी हिल्स, केरळ
केरळ मधील हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. वेस्टर्न घाट मध्ये वसलेल्या या ठिकाणी मस्त धुक्याची चादर असणारे डोंगर दऱ्या आहेत तसेच लांबच लांब दिसणारे चहाचे मळे देखील पाहायला मिळतात. येथे गिर्यारोहण करण्यासाठी देखील अनेक ठिकाणे आहेत तसेच विविध प्रकारची वनस्पती आणि फुले देखील सापडतात. दुर्मिळ प्रजातीची फुलपाखरे देखील येथे पाहायला मिळतात. या ठिकाणाला आवर्जून भेट नक्की द्यायला हावी.
२) निगोज, महाराष्ट्र
अहमदनगर जिल्ह्यात वसलेले निगोज हे एक छोटे गाव आहे. येथे अनेक मोठी रांजणखळगी आहेत आणि याच रांजणखळग्यांमुळे निगोज प्रसिद्ध आहे. कुकडी नदी पात्रात मोठे खडक आहेत आणि याच खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांना रांजणखळगे म्हणतात. निसर्गाचा एक अद्भुत अविष्कार असे या रांजणखळग्यांना हटले तर वावगे ठरणार नाही. नोगोज हे अहमदनगर पासून ७० कि.मी.अंतरावर असलेल्या निघोज येथे एकदा तरी नक्की जायलाच हवे.
३) माजुली, आसाम
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेले हे नदीमध्ये असणाऱ्या बेटांमधील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. सुंदर फुले, हिरवळ, वैविध्यपूर्ण संस्कृती तसेच मनापासून स्वागत आणि मदत करणारे आदिवासी देखील आहेत. माजुली येथील विष्णू मठाला आवर्जून भेट द्यायला हवी. हा मठ १५ व्या शतकातील आहे. या बेटावर विविध प्रकारचे पक्षी देखील आढळून येतात आणि बोटीने फिरण्याचा मनसोक्त आनंद देखील लुटता येतो.
४) मेचुका, अरुणाचल प्रदेश
अरुणाचल मधील मेचुका हा एक छोटा प्रदेश आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर असून येथील आदीवासी अतिशय मनमिळावू आणि मदत करणारे आहेत. मेचुका येथील साम्तेन यॉन्गचा मठ पाहण्यासारखा असून हा मठ ४०० वर्ष जुना आहे. बलाढ्य सियोम नदी देखील येथे असून पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद देखील लुटू शकतात. अतिशय सुंदर असणाऱ्या या प्रदेशा फिरायला एकदा तरी जायलाच हवे. बर्फाची चादर पसरलेले डोंगर देखील येथील निसर्गसौंदर्यात भर टाकतात.
५) संदकफू, पश्चिम बंगाल
३६३६ फूट उंचीवर संदकफू स्थित आहे. संदकफू हे पश्चिम बंगाल मधील सर्वात उंच शिखर आहे. येथे विविध विषारी वनस्पती आढळून येतात पण जगातील ४ सर्वात उंच शिखरे देखील येथून दिसतात आणि हे दृश्य पाहण्यासाठीतरी नक्कीच या जागेला भेट द्यायला हवे. गिर्यारोहकांसाठी विशेषतः हे एक उत्तम ठिकाण आहे. शिखरावरून कांचनजंगा, एवरेस्ट, मॅकलु, होतसे या शिखरांचे डोळे दिपवून टाकणारे दृश्य पाहायला मिळते.
६) जावाई, राजस्थान
वन्यजीवन प्रेमींसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम. राजस्थान मधील पाली जिल्ह्यात स्थित असलेल्या या ठिकाणाला ' लेपर्ड हिल ऑफ इंडिया ' देखील म्हटले जाते. येथे दिवसादेखील भरपूर बिबटे दिसतात म्हणून या भागाला ' लेपर्ड हिल ऑफ इंडिया ' असे म्हणतात. विविध स्थलांतरित पक्षी आणि वन्यप्राणी येथे भरपूर संख्येत आढळतात. बिबट्या, कोल्हा, हरीण, काळवीट, फ्लॅमिंगो आणि स्लॉथ बेअर असे जंगली प्राणी येथे पाहायला मिळतात.
भारत सर्वच प्रकारे समृद्ध देश असून आपल्या देशात संस्कृती, भाषा, निसर्गसौंदर्य इत्यादी गोष्टी भरभरून आहेत तसे फॉरेनएवढाच अथवा त्याहूनही अधिक सुंदर ठिकाणे आपल्या देशात आहेत. इतकी सुंदर ठिकाणे आहेत कि एकदा गेल्यावर पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा नक्कीच होते. मग पुढची सुट्टी यापैकी कुठल्या ठिकाणावर घालवायची हे तर तुम्ही ठरवलेच असेल. कळवा आम्हाला देखील.