हैदराबादला जाताय? मग 'या' एडव्हेंचर स्पोर्टसचा घ्या आनंद

adventure sports in hyderabad nagpur news
adventure sports in hyderabad nagpur news

नागपूर : नवाबांचे शहर म्हणजे हैदराबाद. या शहराचे नाव घेताच टेस्टी, खमंग बिर्याणी, नॉनव्हेज आणि मिठाई, असे अनेक पदार्थ डोक्यात येतात. तसेच या शहराचा एक समृद्ध इतिहास आहे. त्यामुळे हैदराबाद शहराचे महत्व काही वेगळे आहे. इथे फिरायला गेल्यानंतर शहरासोबतच आजूबाजूच्या परिसरात देखील अनेक पर्यटन स्थळं आहेत. तुम्ही हैदराबादला गेल्यानंतर आपल्या शहरामध्ये आल्याचा अनुभव तुम्हाला येईल. तसेच तसेच तुम्हाला एडव्हेंचर्स ट्रीप करायची असेल तर त्यासाठी देखील हैदराबादमध्ये अनेक अ‌ॅडव्हेंचर्स पार्क आहेत, त्याठिकाणी तुम्ही एंजाय करू शकता. चला तर जाणून घेऊया या शहरातील पर्यटन स्थळांविषयी...

बंजी जंपिंग -
एडव्हेंचर्स स्फोट्स आवडणाऱ्या महिलांचे बंजी जपिंग हे सर्वात आवडते असते. हा एक साहसी खेळ असून तुम्ही हैदराबादमध्ये त्याचा आनंद घेऊ शकता. हैदराबादमध्ये भारतातील सर्वात लांब असलेला बंजी जपिंग तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुम्ही अ‌ॅडव्हँचर्स स्पोर्ट कधी खेळले नसेल तरी तुम्हाला याठिकाणी आनंद लुटता येईल. तुम्हाला २०० फूट उंचीवरून क्रेनने खाली सोडण्यात येईल. हा खरंच एक थ्रिंलिंग अनुभव आहे, जो तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.

गो कार्टींग -
गो कार्टींग हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय साहसी खेळ आहे. तुम्ही एकटेही हे करू शकता किंवा तुमच्या मित्रांसोबतही तुम्ही गो कार्टींगचा आनंद घेऊ शकता. मित्रांसोबत खेळत असाल तर तुम्ही एकमेकांशी स्पर्धा करू शकता. हैदराबादमधील हस्तान गो-कार्टींग सोडून तुम्ही रनवे ९ आणि शमशाबाद ऑपरेशन येथील एडव्हेंचर्स स्पोर्टसचा देखील आनंद घेऊ शकता.

ट्रेकींग -
तुम्हाला ट्रेकींग करायची असेल तर हैदराबाद हे सर्वात सुंदर वातावरण आणि निसर्गाचे परिपूर्ण असलेले स्थळ आहे. अनंतगिरी, भोंगिर किल्ला, गोलकोंडा किल्ला, घानपूर, मेडक, आदी ठिकाणी तुम्ही ट्रेकींगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील प्राचीन साहित्य देखील तुम्हाला बघता येईल. मंदिर आणि किल्ल्यावरील कोरीव नक्षीकाम बघितल्यानंतर नक्कीच डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.

जोरबिंग -
जोरबिंग हे सर्वांचे आवडते असते. यामध्ये तुम्हाला एका मोठ्या प्लास्टाकी बॉलच्या आतमध्ये टाकलले जाते. त्यानंतर आकाश आणि जमीनमधील अंतर तुम्हाला विचारले तर तुम्ही सांगू शकणार नाही. हैदराबादमध्ये या खेळाचा तुम्हाला चांगला अनुभव घेता येईल.

जिपलाइनिंग -
तुम्हाला काहीतरी नवीन आणि थ्रिलिंग करायचे असेल तर तुम्ही जिपलाइनिंग ट्राय करू शकता. यामध्ये एका केबलच्या सहाय्याने तुम्हाला बांधले जाईल. त्यानंतर एक टोकावरून दुसऱ्या टोकावर केबलच्या सहाय्याने जावे लागेल. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळे केल्याचा अनुभव मिळेल. तुम्ही द ग्रेट हैदराबाद एडव्हेंचर क्लब किंवा पाम एक्सोटिका बुटीक रिसोर्ट या दोन्ही क्लबमध्ये या खेळांचा आनंद घेऊ शकता.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com