पहिला हिमालयन ट्रेक करायचाय? हे आहेत 5 बेस्ट पर्याय!

हर्षदा कोतवाल
Wednesday, 5 February 2020

पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात यंदा थंडी फारशी पडली नाही आणि आता उन्हाळ्याची चाहूलही लागायला लागली. उन्हाळा जोर धरू लागला, की महाराष्ट्रातले ट्रेक कमी होतात. पण, म्हणून आपण फिरणं बंद करणार नाही. आता आपण हिमालयाच्या कुशीत फिरणार. गेल्या महिन्यात आपण सह्याद्रीतल्या भारी जागांची ओळख करून घेतली. आपण आज हिमालयातील फेमस आणि अगदी पहिल्यांदा हिमालयात ट्रेक करणाऱ्यांनाही सोपे जातील अशा ट्रेकबद्दल जाणून घेऊयात.

पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात यंदा थंडी फारशी पडली नाही आणि आता उन्हाळ्याची चाहूलही लागायला लागली. उन्हाळा जोर धरू लागला, की महाराष्ट्रातले ट्रेक कमी होतात. पण, म्हणून आपण फिरणं बंद करणार नाही. आता आपण हिमालयाच्या कुशीत फिरणार. गेल्या महिन्यात आपण सह्याद्रीतल्या भारी जागांची ओळख करून घेतली. आपण आज हिमालयातील फेमस आणि अगदी पहिल्यांदा हिमालयात ट्रेक करणाऱ्यांनाही सोपे जातील अशा ट्रेकबद्दल जाणून घेऊयात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनुभवावरून सांगते, की सह्याद्रीतील ट्रेक हिमालयापेक्षा जास्त अवघड असतात. तरीही, हिमालयीन ट्रेक्‍स अवघड का वाटतात? त्याला प्रमुख तीन कारणे आहेत. 
१) हे ट्रेक्‍स खूप मोठे असतात. 
२) उंची खूप जास्त असते. 
३) आपल्याला हाडे गोठवणाऱ्या थंडीची सवय नसते. 
हिमालयात ट्रेक्‍सला सुरुवात करायची तर काही भन्नाट सौंदर्य असलेले सोपे ट्रेक्‍स आहेत, ज्याने आपण सुरुवात करू शकतो.

फिरस्ते : सांधण व्हॅलीचा अद्‍भुत थरार

खिरगंगा -
हिमाचल प्रदेशामध्ये उन्हाळ्यात करण्यासाठी खिरगंगा बेस्ट ट्रेक आहे. हा ट्रेक केवळ दोन दिवसांत होतो. जंगलातून सुरू होणारी वाट आणि शेवटपर्यंत साथ देणाऱ्या पार्वती नदीमुळे हा ट्रेक खूप भारी होतो. या ट्रेकची जमेची बाजू म्हणजे याच्या समिटवर गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. थंड वातावरणातून ट्रेक पूर्ण केल्यावर या कुंडात डुबकी घेतल्यावर सगळा शीण निघून जातो. 

 •   उंची : १३,०५१ फूट 
 •   लागणारा वेळ : दोन दिवस 
 •   अंतर : १५ किलोमीटर 
 •   बेस कॅम्प : कसोल, हिमाचल प्रदेश 
 •   कधी जाल? : मे- ऑक्‍टोबर 
 •   कसे जाल? : दिल्लीहून मनालीसाठी सारख्या बस असतात. भुंतरला उतरून कसोलपर्यंत कॅब किंवा हिमाचल प्रदेशच्या मनिकर्णच्या बसने जाता येते. 

Image result for khirganga"

नागटिब्बा -
उत्तराखंडमध्ये एकाहून एक भारी आणि अनएक्‍सप्लोअर्ड ट्रेक्‍स आहेत. नागटिब्बा त्यातलाच एक. हा ट्रेकसुद्धा केवळ दोन दिवसांत होतो. देवदार झाडांच्या जंगलातून हा ट्रेक केला जातो. या ट्रेकच्या समिटवरून स्वर्गरोहिणी, बंदरपूंच, ब्लॅक पिक आणि अशा अनेक शिखरांचा नजारा मिळतो. 

 •   उंची : ९,९१४ फूट 
 •   लागणारा वेळ : दोन दिवस 
 •   अंतर : १९ किलोमीटर 
 •   बेस कॅम्प :  पंतवारी, उत्तराखंड 
 •   कधी जाल? : पावसाळा सोडून कधीही 
 •   कसे जाल? : दिल्लीहून डेहराडूनपर्यंत रेल्वेने जाता येते, तो स्वस्त पर्याय आहे. डेहराडूनपासून पंतवारीपर्यंत कॅब करता येते. 

Image result for nagtibba"

भ्रिगू लेक - 
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाने आच्छादलेल्या तलावाची मजा घ्यायची असल्यास हा ट्रेक नक्कीच करा. थंडीच्या दिवसांत हा तलाव गोठलेला असतो, तर उन्हाळ्यात चारही बाजूंनी हिरवेगार डोंगर आणि मध्यभागी स्वच्छ पाण्याच्या हा तलाव आपल्याला स्वर्गाहून सुंदर अनुभव देतो. 

 •   उंची : १४ हजार फूट 
 •   लागणारा वेळ : चार दिवस 
 •   अंतर : २५ किलोमीटर 
 •   बेस कॅम्प : गुलाबा, हिमाचल प्रदेश 
 •   कधी जाल? : पावसाळा सोडून कधीही 
 •   कसे जाल? : मनालीवरून रोहतांग पासच्या रस्त्यावर कोठीपर्यंत कॅबने जाता येते.

नेढ्याचा रतनगड; सोनकीचा स्वर्ग पाहण्यासाठी हक्काचे ठिकाण

Image result for bhrigu lake"

ब्रह्मतल -
उत्तराखंडमध्ये सर्वांत सुंदर आणि अनएक्‍सप्लोअर्ड असा हा ट्रेक आहे. या ट्रेकच्या समिटवरून माऊंट त्रिशुल, अली बुगियाल, बेदनी बुगियाल अशा शिखरांचा नजारा मिळतो. या ट्रेकमध्ये बर्फात, जंगलात राहायला मिळते. पहिल्या कॅम्पसाईटवर आणि समिटवर दोन्हीकडे दोन तलाव आहेत. त्यामुळे या ट्रेकचे सौंदर्य अजूनच वाढते. 

 •   उंची : १२,१०० फूट 
 •   लागणारा वेळ : चार दिवस 
 •   अंतर : २२ किलोमीटर 
 •   बेस कॅम्प : लोहजंग, उत्तराखंड 
 •   कधी जाल? : पावसाळा सोडून कधीही 
 •   कसे जाल? : दिल्लीहून काठगोडामला रेल्वेने येता येते. तिथून लोहजंगपर्यंत कॅबने जाता येते. 

Image result for brahmatal"

ब्यासकुंड -
मनालीमधल्या सर्वांत सुंदर ट्रेक्‍समध्ये याची गणना केली जाते. बिसकुंड ट्रेकला धार्मिक महत्त्व आहे. या ट्रेकच्या सुरुवातीलाच हनुमान टिब्बा शिखराचे दर्शन होते. 

 •   उंची : १२,७७२ फूट 
 •   लागणारा वेळ : चार दिवस 
 •   अंतर : २२ किलोमीटर 
 •   बेस कॅम्प : सोलंग व्हॅली, हिमाचल प्रदेश 
 •   कधी जाल? : पावसाळा सोडून कधीही 
 •   कसे जाल? :  मनालीहून सोलंग व्हॅली फक्त १३ किलोमीटर अंतरावर आहे. मनालीहून इथे कॅबने जाता येते.

Image result for byaskund"

इन्स्टाग्राम हॅंडल : @harshadakotwal5 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article harshada kotwal on himalay trekking