esakal | स्वर्गापेक्षा कमी नाही मिझोरामची ही सुंदर घाटी 
sakal

बोलून बातमी शोधा

स्वर्गापेक्षा कमी नाही मिझोरामची ही सुंदर घाटी 

येथील लोकांचे वागणे खूप सरळ आहे. शिवाय येथील परंपरा ईशान्येमध्ये खूप प्रसिध्द आहेत. सध्याच्या धकाधकीच्या युगात चंपाई घाटी कोणासही आपले बनवेल. या जागेला उत्तर-पूर्वेतील भाचाचे कोठार असे म्हणतात.

स्वर्गापेक्षा कमी नाही मिझोरामची ही सुंदर घाटी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : ईशान्येकडील नैसर्गिक दृश्यांच्या सौंदर्यामुळे कोणत्याही फिरस्त्या व्यक्तीला त्याकडे दुर्लक्ष करणे अवघड होते. येथील दृष्ये अशी आहेत की एकदा का येथे गेलात की परत यावे असेच वाटत नाही. मिझोरामच्या चम्फाई घाटीमधील दृष्ये तर स्वर्गापेक्षा कमी नाहीत. चला तर मग पाहूया कशी आहे ही घाटी. 

चम्फाई घाटी मिझोराम आणि म्यामारच्या सीमेवरील एक छोटेसे शहर आहे. हे शहर मिझोरामधील एक सर्वात पसंती शहर आहे. चम्फाई घाटी एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाचा जीवंत नजरानाच आहे. येथे  बरेच तलाव आणि धबधबे देखील येथे आहेत, जे पाहून तुम्ही एका स्वर्गात गेल्याचा भास होईल.
 
येथील लोकांचे वागणे खूप सरळ आहे. शिवाय येथील परंपरा ईशान्येमध्ये खूप प्रसिध्द आहेत. सध्याच्या धकाधकीच्या युगात चंपाई घाटी कोणासही आपले बनवेल. या जागेला उत्तर-पूर्वेतील भाचाचे कोठार असे म्हणतात. कारण येथे सर्वात जास्त भाताची लागवड केली जाते. ही ठाजागा तर अतिशय सुंदर आहेच. परंतु, तुम्ही जर हनिमुनसाठी एक उत्तम ठिकाण शोधत असाल तर चम्फाई घाटी सर्वात चांगला पर्याय असेल. 

चम्फाई खोऱ्यात एक तलाव आहे, जो पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकानी फिरायचे असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. कारण येथील ठिकाणाचे साेंदर्य अबाधित राहावे हा उद्देश आहे. 
 
राष्ट्रीय उद्यान

तुम्हाला जर वन्य प्राण्यांची आवड आहे तर तुम्ही चम्फाई घाटातील राष्ट्रीय उद्यानाला जरूर भेट दिली पाहिजे.  सुमारे 100 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये वसलेल्या या उद्यानात  हिमालयीन काळे अस्वल, बिबट्या, वाघ आणि इतर अनेक प्राणी पाहायला मिळतील. येथे अनेक लेणी आहेत. याविषयी असे म्हटले जाते की हे भूतांपासून लपविण्यासाठी प्राचीन काळी ही लेणी बांधण्यात आली होती.  

कसे जाल?

चंम्फाईला जाण्यासाठी आयजॉल पासून रस्त्याने जाता येते. आयजाॅलला पोहोचण्यासाठी तुम्ही हवाई मार्गाने पण जाऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बैराबी किंवा सिलचर आहे जिथून तुम्ही चंम्फाईला जाऊ शकता. येथे राहण्यासाठी अनेक गेस्ट हाऊस आणि हाॅटेल सहज उपलब्ध होतात.

असा बनवा शाही काजू हलवा

loading image
go to top