गोव्याविषयी तुम्हाला 'या' सात गोष्टी माहिती आहेत का? 

अवित बगळे 
Friday, 20 December 2019

गोवा महाराष्ट्राला लागून असला, तिथं मराठी भाषा सर्वाधिक बोलली जात असली तरी, गोवा महाराष्ट्रापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या खूपच वेगळा आहे. गोव्याला जाण्यापूर्वी जाणून घ्या या गोव्याविषयी...

पणजी : डिसेंबर महिना म्हटलं की गोव्याकडं पर्यटकांचा ओघ वाढतो. पण, गोव्याला भेट देणाऱ्या अनेकांना गोव्याविषयी अगदी बेसिक माहितीही नसते. गोवा महाराष्ट्राला लागून असला, तिथं मराठी भाषा सर्वाधिक बोलली जात असली तरी, गोवा महाराष्ट्रापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या खूपच वेगळा आहे. गोव्याला जाण्यापूर्वी जाणून घ्या या गोव्याविषयी...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्वातंत्र्य
भारताला इंग्रजांकडून 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. पण, गोव्याला पोर्तुगिजांपासून मुक्त करण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा स्वतंत्र झाला.

गोव्याच्या आधीच्या सीमा
आजचा गोवा हा १२ तालुक्यांचा असला तरी, पूर्वीचा गोवा नऊशे गावांचा म्हणजे आजच्यापेक्षा मोठा होता. त्याच्या सीमारेषा दक्षिणेस गोकर्णाच्या अलीकडे असलेली गंगावली नदी आणि उत्तरेला कोकणात कुडाळ गावाच्या पुढं आजरा नदी अशा होत्या.

Image result for GOA

पोर्तुगालचे नागरिकत्व मिळते 
आजही गोमंतकीय नागरीकास पोर्तुगालचे नागरीकत्व विनासायास घेता येते. त्यासाठी पोर्तुगीज सरकारने पणजीत वकीलात उघडली आहे. १९ डिसेंबर १९६१ पूर्वी जन्मलेली व्यक्ती व त्यापुढील दोन पिढ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. त्यासाठी एक साधा अर्ज भरून द्यावा लागतो.

दुचाकी व्यवसाय घराघरांत
गोव्यात पर्यटकांना फिरण्यासाठी दुचाक्या व कार भाड्याने मिळतात. किनारी भागात घरोघरी हा व्यवसाय केला जातो. त्याशिवाय प्रवाशाला इच्छीत स्थळी दुचाकीवर बसवून पोचवण्याचा व्यवसायही गोव्यातूनच इतरत्र पसरला आहे. या सेवेला गोव्यात पायलट सेवा म्हणतात.

गोव्याला जाताय? हे बिच तुम्हाला माहिती आहेत का?

सोळा जातींचा ख्रिस्ती समाज
जगभरात ख्रिस्ती समाजात जाती नाहीत. पण, गोमंतकीय खिस्ती समाजात सुमारे सोळा जाती आहेत. त्यांच्यात पोट जाती नाहीत. लग्न गीतांचे गायन, चुडा भरणे, ओटी भरणे, मांडव परतणी हे विधी गोमंतकीय ख्रिस्ती समाजातही होतात.

Image result for GOA village

हिंदू-ख्रिस्ती एकत्र
उत्तर गोव्यात शिवोली येथे जागरयो या देवतेचा उत्सव होतो. हिंदू व खिस्ती एकत्र येऊन जार या नावाचे नृत्यनाट्य सादर करतात.

पशुरामाचे एक मंदिर
गोवा ही परशुराम भूमी मानली जाते पण गोव्यात परशुरामाचे फक्त एक मंदिर दक्षिण गोव्यात पैंगीण येथे आहे.

संमोहन शास्त्र गोव्याचे
जगात संमोहन शास्त्राचा उगम गोव्यात झाला असे मानले जाते. त्याचा शोध लावणारे आबे फारीया हे गोव्यातील कांदोळी येथील. त्यांच्या पुतळा जून्या सचिवालय इमारतीच्या बाजूला आजही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know the seven things about Goa

Tags
टॉपिकस
Topic Tags: