राजेशाही थाट असलेली महाराजा एक्सप्रेस; एका तिकिटाची किंमत 18 लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

भारतातील या महाराजा एक्सप्रेसचा प्रवास हा जगातील सर्वात विलासी आणि महागडा प्रवास मानला जातो. एक किलोमीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये एकूण 23 डब्बे असून एका वेळी केवळ 88 प्रवासी प्रवास करू शकतात.

महाराजा एक्सप्रेसचं नाव कधी ना कधी ऐकलं असेलच. खरंतर या रेल्वेची चर्चा झाली ती म्हणजे तिकिटाची किंमत आणि रेल्वेत असलेल्या राजेशाही थाटाची. भारतातील या महाराजा एक्सप्रेसचा प्रवास हा जगातील सर्वात विलासी आणि महागडा प्रवास मानला जातो. या ट्रेनची भव्यता ऐवढी आहे की यातील सेवा अनुभवल्यानंतर एखादं पंचतारांकित हॉटेल देखील तुम्हाला कंटाळवाणं वाटेल. इथं प्रवाशांना खाणे-पिणे आणि राहण्याच्या सुविधा राजा-महाराजासारख्या असतात. बरेच लोक या ट्रेनमधल्या शाही प्रवासासाठी वेटिंगला असतात. 

zoom

महाराजा एक्सप्रेसनं बर्‍याच वेळा 'वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड' जिंकला आहे.  या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकिटांची किंमत तब्बल 18 लाख रुपयांपर्यंत आहे. तिकिटाचे दर थोडेसे कमी जास्त होत होत असतात.

Maharaja Express Luxury Train Presidential Suite

महाराजा एक्स्प्रेस 2010 मध्ये देशात प्रवाशांना राजेशाही थाटाची अनुभूती देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. एक किलोमीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये एकूण 23 डब्बे असून एका वेळी केवळ 88 प्रवासी प्रवास करू शकतात. प्रत्येक प्रवाशाला राजेशाही थाट मिळावा म्हणून या ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या कमी ठेवली गेली आहे. 

Maharaja Express Luxury Rail Presidential Suite

महाराजा एक्स्प्रेसचा प्रवास हा जगातील सर्वात महागडा प्रवास मानला जातो. ही रॉयल ट्रेन दिल्ली, आग्रा, बीकानेर, फतेहपूर सिक्री, ओरच्छा, खजुराहो, जयपूर, जोधपूर, उदयपूर, रणथंभोर, वाराणसी आणि मुंबईला जाते. प्रवासादरम्यान प्रवाशांसासाठी राहण्याची सोय मुंबईतील ताजमहल पॅलेस हॉटेल, राजस्थानचं सिटी पॅलेस, रामबाग पॅलेस हॉटेल अशा अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये  केली जाते. 

zoom

ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्यारा एखादं हॉटेल रुळावर धावत असल्याचं भासतं. ट्रेनमध्ये ऑनबोर्ड रेस्टॉरंट, डिलक्स केबिन, आणि लॉन्च बार सारख्या अनेक लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.  महाराजा एक्स्प्रेस प्रवासादरम्यान प्रवाशांना 'भारत दर्शन' घडवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india Maharaja Express Luxury Train know details