PHOTO : केरळमधील हा महाकाय 'जटायु' बघितला का?

टीम ईसकाळ
Saturday, 16 November 2019

तिरूअनंतपुरममध्ये पक्षाची जगातील सर्वात मोठी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रामायणातील जटायुची भव्यदिव्य प्रतिकृती बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. जटायु अर्थ सेंटर असे या प्रतिकृतीचे नाव आहे.

तिरूअनंतपुरम : सध्या सगळीकडे सरदार सरोवरावर दिमाखात उभ्या असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची चर्चा सुरू आहे. भारतातील सर्वात मोठा पुतळा म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटीचे नाव घेतले जाते. पण, त्याच वेळी केरळमधील महाकाय अशा जटायुच्या पुतळ्याचीही चर्चा होत आहे. तिरूअनंतपुरममध्ये पक्षाची जगातील सर्वात मोठी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रामायणातील जटायुची भव्यदिव्य प्रतिकृती बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. जटायु अर्थ सेंटर असे या प्रतिकृतीचे नाव आहे.

 jatayu kerala

अशी आहे जटायुची प्रतिकृती
तिरूअनंतपुरमच्या धरतीवर साकारलेली ही प्रतिकृती पक्षाची जगातील सर्वांत मोठी प्रतिकृती समजली जाते. रामायणात ज्या पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली व रामाला सीतेपर्यंत जाण्यास वाट दाखविली त्या जटायुची ही प्रतिकृती बघण्यासाठी देशभरातून लोक जातात. 200 फूट लांब, 150 फूट जाडी तर 65 फूट उंच असलेला हा जटायू तिरूअनंतपुरममध्ये उंचावरील एका महाकाय खडकावर साकारण्यात आला आहे. 65 एकरात बांधलेली ही प्रतिकृती समुद्रसपाटीपासून 1000 फूटावर आहे. 

Image result for jatayu kerala

Image result for jatayu kerala

कसा बनविला जटायु? 
जटायुची ही प्रतिकृती हॉलीवुडमध्ये बनविण्यात आली व तिरूअनंतपुरममध्ये बसविण्यात आली. या प्रतिकृतीसाठी 100 करोड इतका खर्च करण्यात आला असून, आता ही प्रतिकृती केरळ प्रशासनाच्या देखरेखीखाली येते. 

 jatayu kerala

जटायुच्या आतमध्ये काय आहे?
फिल्ममेकर राजीव आँचल यांच्या संकल्पनेतून ही जटायुची प्रतिकृती साकारली आहे. 4 जुलै 2018ला या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रतिकृतीच्या आत संग्रहालय व 6D थिएटर आहे. या थिएटरमध्ये 10 मिनिटांचा जटायु निर्मितीची फिन्म दाखविण्यात येते. जटायुच्या या प्रतिकृतीमुळे केरळच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

JATAYU


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala S World s Largest Bird Sculpture Jatayu