esakal | गोव्याला फिरायला जाताय, तर मग हे कॅफेंना आवर्जून भेट द्या

बोलून बातमी शोधा

know about some must visit best cafes in goa Marathi article}

तुम्ही देखील गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि गोव्याच्या  ट्रिपमध्ये तुम्हाला  काही भन्नाट आठवणी जोडायच्या असतील, स्वतःच्या जिभेचे मनसोक्त चोचले पुरवायचे असतील तर तेथे असलेल्या कॅफेंना तुम्ही नक्की भेट द्यायलाच हवी,  आज आपण अशाच गोव्यातील काही उत्कृष्ट कॅफेबद्दल जाणून घेणार आहोत..

tourism
गोव्याला फिरायला जाताय, तर मग हे कॅफेंना आवर्जून भेट द्या
sakal_logo
By
टीम ईसकाळ

फिरायला जाण्याचा विचार डोक्यात आला की पहिले ठिकाण आठवते ते गोवा! सुंदर समुद्रकिनारे आणि दर्जेदार जेवण गोव्याला परफेक्ट पर्यटनस्थळ बनवते. गोव्याची नाईट लाईफची मजाच काही वेगळी आहे. देशभरातून हजारो पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात. तुम्ही देखील गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि गोव्याच्या  ट्रिपमध्ये तुम्हाला  काही भन्नाट आठवणी जोडायच्या असतील, स्वतःच्या जिभेचे मनसोक्त चोचले पुरवायचे असतील तर तेथे असलेल्या कॅफेंना तुम्ही नक्की भेट द्यायलाच हवी,  आज आपण अशाच गोव्यातील काही उत्कृष्ट कॅफेबद्दल जाणून घेणार आहोत..

कॅफे चॉकलेट, कॅन्डोलिम 

कॅफे चोकलेटी हा एक सुंदर कॅफे आहे. हा कॅफे मालकाच्या घराचाच भाग असलेला हा कॅफे विशेषतः गोड पदार्थांसाठी ओळखला जातो.  भेट दिल्यानंतर येथे मिळणारे होममेड चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी जाम टेस्ट करायला विसरु नका. गजबजलेल्या बागांनी वेढलेला हा कॅफे तुम्हाला नक्की आवडेल. 

द राईस मिल, मोरजिम

१९९५ मध्ये जुन्या राईस मिलमध्ये सेट केलेले हा कॅफे सर्वांना सकारात्मक वाईब्स देतो.  कॅफेच्या पिवळ्या भिंती मुळे येथे नेहमी आनंददायी वातावरण असतं.  हा सुंदर कॅफे मोरजिमच्या ग्रामीण भागात असून  येथे चिकन आणि प्रॉन डिशेस नॉनव्हेजप्रेमींनी आवर्जून घ्यावा. 

सकाना, वॅगेटर

सकाना ही गोव्यातील सर्वोत्तम कॅफे पैकी एक आहे. येथे आपल्याला बर्‍याच सर्वोत्कृष्ट जपानी डिशची चाखायला मिळतील. तसेच हा कॅफे प्रसिद्ध अंजुना बीच आणि व्हेगोटर बीच दरम्यान आहे. येथे आपण सुशी व्यतिरिक्त बीफ करी आणि कॅलिफोर्निया रोलचा आनंद घेऊ शकता. 

लीला कॅफे, अंजुना

हा कॅफे शॅक्स (Shacks) म्हणजेच झोपडीच्या ढंगात डिझाइन केलेला आहे. लीला कॅफे गोव्यातील एक उत्तम कॅफे आहे, जिथे प्रवासी युरोपियन पदार्थांचा स्वाद घेऊ शकतात. हा कॅफे जर्मनीतील एक जोडपं चालवतं. येथे गेल्यावर क्रोसेंट, रॅटौइल आणि हेम आमलेट हे पदार्थ नक्की खाऊन पाहा. 

ब्लॅक व्हॅनिला, पंजिम 

जर आपण गोव्यातील एखादे ठिकाण शोधत असाल, याठिकाणी तुम्ही थोडा वेळ शांत बसून राहू शकता. आणि आपल्या अन्नाचा आनंद घेऊ शकता. ब्लॅक व्हेनिला हा देखील गोव्यातील बेस्ट कॅफेपैकी एक आहे. पंजिमच्या मध्यभागी असलेला हा कॅफे उत्तम जेवण आणि सजावटीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणचे बर्गर आणि चिकन बार्बेक्यू बर्गर खूप प्रसिद्ध आहे. 

एवा कॅफे, अंजुना 

एवा कॅफे हा अंजुना बीचच्या किना-यावर आहे, तुम्हा या ठिकाणी बसून देखण्या सुर्यास्ताचा आनंद घेत चवदार जेवणाचा देखील आस्वाद घेऊ शकता. हा खरोखरच गोव्यातील एक सर्वोत्तम कॅफे आहे.