esakal | kayaking साठी परफेक्ट आहे गोव्यातील हा बीच, एकदा आवश्य भेट द्या

बोलून बातमी शोधा

know the which  beach in Goa is perfect for kayaking Marathi article}

गोवा जगभरात आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक गोव्याला फिरायला येतात. तसेच, कोरोना महामारीमुळे  2020 मध्ये गोव्याच्या रस्त्यांवर शांतता होती. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर गोवा पर्यटकांसाठी खुला झाला आहे.

tourism
kayaking साठी परफेक्ट आहे गोव्यातील हा बीच, एकदा आवश्य भेट द्या
sakal_logo
By
टीम ईसकाळ

गोवा जगभरात आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक गोव्याला फिरायला येतात. तसेच, कोरोना महामारीमुळे  2020 मध्ये गोव्याच्या रस्त्यांवर शांतता होती. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर गोवा पर्यटकांसाठी खुला झाला आहे. यामुळे पर्यटकांची पावले पुन्हा एकदा गोव्याकडे वळू लागली आहेत. गोव्यात बरीच ठिकाणे आहेत स्थळे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यातील एक म्हणजे कोला बीच. हा गोव्यातील सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा असल्याचे मानले जाते. जर तुम्हीदेखील गोव्याला फिरायला जाण्याचा प्ल२न करत ठरवत असाल तर कोला बीच (Cola Beach) च्या आसपास फिरायला नक्कीच जा. आज आपण याच बीचबद्दल माहिती घेणार आहोत. 

कोला बीच

गोव्यातील हा सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे. या बीचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोला बीचवर अद्याप व्यावसायिककरण गजबज झालेली नाही. यामुळे, आपल्याला येथे गोव्यातील इतर ठिकाणांप्रमाणमे गर्दी दिसणार नाही आणि आपण आनंददायक सहलीचा आनंद घेऊ शकता. या किनाऱ्यावर एक खाडी देखील आहे. कुठतरी निवांत पण तेवढ्याच सुंदर अशा ठिकाणाला भेट देण्याचा विचार असेल  तर आपण कोला बीचवर आवर्जून जाऊ शकता. या समुद्रकिनारावर तुम्हाला महागडे हॉटेल्स, रिसॉर्ट दिसणार नाहीत, परंतु इथे नैसर्गिक सौंदर्य मात्र पाहण्यासारखे आहे. राहण्यासाठी  तुम्हाला जुनी पण पण कामचालाऊ तंबू मिळतील. 

कोला बीचवर काय कराल?

आपण कोला बीचवर पोहण्याचा आनंद घेऊ शकता. खाडीचे स्वच्छ आणि निल्याशार पाण्यात डुंबण्याची मजा वेगळीच आहे. यासोबतच तुम्ही बीचवर कायकिंगचा आनंदही घेऊ शकता. तसेच येथे सूर्यास्त खूपच सुंदर असचो. या बीचच्या जवळपास इतर अनेक छोटे समुद्रकिनारे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. तुम्ही एकदा या ठिकाणाला भेट दिली तर तुम्ही या बिचच्या प्रेमात पडाल. तर नक्की ट्राय करा.