मॅमथ लेकमधील साहस पाहाल, तर थक्क व्हाल...अमेरिकेचा पर्यटनवृद्धींचा अनोखा फंडा

राहुल रनाळकर
Thursday, 14 May 2020

यंदाचा सुट्ट्यांच्या हंगामात तर पर्यटन क्षेत्र पार विस्कटून गेलं. अमेरिकेतील अनेक बुकिंग्ज रद्द झालेली आहेत. पण विविध शक्कल लढवून आपापल्या क्षेत्राचे रक्षण करण्याचा प्रयत्न सर्व जगभर होतोय, तसाच प्रयत्न अमेरिकेत देखील होताना दिसतोय. 

सध्याच्या कोविद-१९चा मोठा फटका अमेरिकेला जसा बसलाय, तसा पर्यटन व्यवसायावरही या जागतिक महामारीचा मोठा परिणाम झालाय. कोरोनामुळे सर्वांत आधी पर्यटन क्षेत्राला फटका बसला तर सावरताना देखील सर्वांत उशीर या क्षेत्रालाच होणार आहे. हे संकट दूर व्हायला पुढचे काही महिने नक्कीच जाणार आहे. यंदाचा सुट्ट्यांच्या हंगामात तर पर्यटन क्षेत्र पार विस्कटून गेलं. अमेरिकेतील अनेक बुकिंग्ज रद्द झालेली आहेत. पण विविध शक्कल लढवून आपापल्या क्षेत्राचे रक्षण करण्याचा प्रयत्न सर्व जगभर होतोय, तसाच प्रयत्न अमेरिकेत देखील होताना दिसतोय. 

Image may contain: one or more people, people standing, mountain, sky, tree, outdoor, nature and water

कॅलिफोर्नियाचे पर्यटन विश्व जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कॅलिफोर्नियाला भेट देतात. परंतु यंदा कोरोना संकटामुळे ही संख्या खूप रोडावली आहे. कॅलिफोर्नियातील मॅमथ लेक ही सर्वांगसुंदर तर आहेच, पण साहसप्रेमींनाही ही लेक नेहमीच खुणावत आली आहे. विशेष म्हणजे मॅमथ लेक येथे भेट देण्यासाठी वर्षभरातील कोणत्याही ऋतूत जाता येते. प्रत्येक ऋतूत तिथे तुम्हाला काहीना काही नक्कीच आनंद लुटता येतो. इथले नैसर्गिक सौंदर्य अलौकीक असेच आहे. उत्तुंग पहाड आणि विस्तीर्ण व्हॅलीमध्ये साहसवीरांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. पण लॉकडाऊनमुळे आत्ता पर्यटक घराबाहेर पडू शकत नाहीत. म्हणूनच इथलं सौंदर्य कसं उदात्त आहे,

Image may contain: sky, snow, tree, outdoor and nature

हे दाखविण्यासाठी कॅलिफोर्निया टुरिझमने व्हीडिओंचा आधार घेतलाय. मॅमथ लेकच्या व्हीडिओंना सध्या जगभर पसंती मिळतेय, विशेष म्हणजे हे व्हीडिओ ३६० डिग्रीमध्ये पाहता येऊ शकतात. हे व्हीडिओ पाहताना आपण एखाद गोष्टीचं पुस्तक वाचत असल्यासारखे वाटते. इथला सर्वांत जास्त पर्यटनप्रेमी साहसप्रकार म्हणजे स्की. स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे, म्हणजे अविस्मरणीय अनुभव. बरं इथं तुम्हाला बेसिक ट्रेनिंगसाठी ट्रेनर्सही उपलब्ध असतात. अमेरिकेचं राष्ट्रीय स्मारक असलेलं डेव्हील्स पोस्टपाईलला जाण्यासाठी उन्हाळ्यानंतर रस्ते खुले होतात. १०१ फुटी रेनबो धबधबाही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. योसेमाईन नॅशनल पार्कमध्ये मुलांना प्रचंड आनंद लुटता येतो. त्यामुळे जेव्हा लॉकडाऊन संपेल आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु होईल, तेव्हा कॅलिफोर्नियातील मॅमथ लेक आणि लेकच्या परिसरातील स्थळांना भेट द्यायलाच हवी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus america tourism mammoth lake