आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर किलीमांजारोवर फडकला 71 फुटी तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आफ्रिका खंडातील सर्वोच्च 5895 मीटर उंचीचे शिखर माऊंट किलीमाजंरोवर कोल्हापूरच्या गिर्यारोहक सागर विजय नलवडेने 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी यशस्वी चढाई केली आहे. तसेच त्याने या शिखरावर प्रजासत्ताक दिनानिमित्त 71 फुटी तिरंगा फडकावला आहे. 

Image may contain: sky, snow, outdoor and nature

आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट किलीमाजंरो सर करण्याच्या या मोहिमेत सागरसह त्याचे सहकारी अर्णाळा वसई येथील रोहित पाटिल, इंदापूर येथील योगेश करे, आणि उत्तर प्रदेश पोलीस कर्मचारी आशिष दीक्षित हे सहभागी होते. या टिमने शिखरावर भारतीय संविधानाचे वाचन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगडावरील माती आणि महाराजांची प्रतिमा या शिखरावर नेऊन महाराजांना आणि सर्व भारतीयांना अभिवादन केले आहे. 

"मोहिम सह्याद्रीच्या लेकराची" आहे या मोहिमेचे नाव होते. या मोहिमेसाठी त्यानां 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याचें सहकार्य लाभले आहे. या मोहिमेला महाराष्ट्रातील सर्व सह्याद्री मित्रांनी बहुमोल आर्थिक सहकार्य केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagar Nalawade summits Mount Kilimanjaro highest peak in Africa on 26th january