1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

या लेखात आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराशी संबंधित काही रंजक तथ्यांबद्दल आम्ही तु्म्हाला माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या ज्ञानात भर पडेल, शिवाय त्या मंदिराला भेटण्याची इच्छा देखील निर्माण होईल.. असे काय आहे त्या मंदिरात, चला जाणून घेऊयात..

1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : आंध्र प्रदेशातील छोटेसे शहर लेपाक्षी! कदाचित; पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रिय नसले, तरी इथल्या मंदिराचे आश्चर्यकारक दृश्य एक वेगळीच कलाकृती दाखवते. या मंदिरातील सर्वात मोठ्या नंदीच्या पुतळ्यापासून ते हवेत विखुरलेल्या खांबापर्यंत लेपाक्षी मंदिराची अनेक आश्चर्यकारक दृश्ये आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, लेपाक्षी मंदिराशी संबंधित काही तथ्यांविषयी...

1583 च्या काळातील नंदीचे आकर्षण.. 

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी हे एक छोटसं लहान गाव. इसवी सन 1583 च्या काळातील वीरभद्र मंदिर आणि वीरभद्राला समर्पित असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. हे भारतातील एक उत्कृष्ट आणि प्राचीन मंदिर असून ह्या मंदिराचे बांधकाम वीरान्ना आणि विरुपन्ना या दोन भावांनी केले होते. विजयनगर साम्राज्याचे हे सर्वात प्राचीन मंदिर समजले जाते. तसेच, हे मंदिर शिल्पांसाठी देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे गणेश, नंदी, वीरभद्र, शिव, भद्रकाली, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती देखील पहायला मिळतात. मुख्य लेपाक्षी मंदिराजवळील विशाल नंदी बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हा नंदी एकाच भल्या मोठ्या दगडात घडवला आहे.

हरिद्वारच्या कुंभमेळ्याला या 12 राज्यांतील लोकांना बंदी; RT-PCR असेल, तरच मिळणार राज्यात प्रवेश

बसवन मंदिरातील नंदी

27 फूट लांबी आणि 15 फूट उंचीची लेपाक्षी येथील बलवान मंदिरातील नंदी मूर्ती ही भारतातील सर्वात मोठी मूर्ती आहे. ही एक विशाल रचना आहे. त्या मूर्तीचा भव्य आकार सर्वांना आकर्षित करीत असतो. हा नंदी एकाच दगडातून घडवला असून याचा आकार खूपच मोठा आणि विलक्षण असा आहे. या नंदीच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर उद्यान म्हणून विकसित करण्यात आला आहे. 

लेपाक्षी मंदिराचे स्तंभ

मंदिरातून जाताना तुम्ही एखाद्या खांबाजवळ पोहोचाल, तेव्हा तुम्हाला हे खांब अदांतरी असल्याचा भास होईल. जे जमिनीवर पूर्णपणे उभे नाहीत. विजयनगर शैलीतील 16 व्या शतकाच्या या भव्य मंदिरात सुमारे 70 खांब आहेत. हे खांब प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील मंदिर बांधकाम करणाऱ्या अभियांत्रिकीची प्रतिभा दर्शवतात. तथापि, या खाबांचे मूळ वेशिष्ठ्य असे की, कागदाचा किंवा कापडाचा पातळ तुकडा कॉलमच्या तळाशी जाऊ शकतो आणि तो अगदी शेवटी न थांबता दुसर्‍या टोकाला ही पोहोचू शकतो, इतके ते खांब सुंदररित्या घडविण्यात आले आहेत.

भारतातील दहा प्राचीन आणि प्रसिद्ध किल्ल्यांची झलक

लेपाक्षी मंदिरातील शिवलिंग

या खांबाजवळून आपण मंदिराच्या अंगणात जाऊ शकता. आता तुम्ही मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असाल. येथून उजवीकडे वळा आणि शेवटी पुन्हा एकदा उजवीकडे वळा. तुम्हाला लवकरच एक विशाल शिवलिंग दिसेल. पण, हे शिवलिंग एका भल्या मोठ्या सापाच्या खाली विसावले आहे. हे एक अद्वितीय शिवलिंग आहे.

लेपाक्षी मंदिराचा अपूर्ण कल्याण मंडप

शिवलिंग ओलांडल्यानंतर तुम्ही अशा एका रचनेवर पोहोचाल, जी अपूर्ण दिसते. हे कल्याण मंडप म्हणजेच, लग्न स्थळ आहे. या जागेला विशेष महत्वप्राप्त आहे. असे म्हणतात, की जर कल्याण मंत्र पूर्ण झाला असता, तर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे येथे लग्न झाले असते. त्याचे बांधकाम तत्कालीन राजाच्या लेखापालने सुरू केले होते, तेव्हा राजा स्वत: एका प्रवासाला (यात्रा) निघाला होता. जेव्हा राजा परत आला, तेव्हा राजाने मान्यता न घेता, राज्याचे पैसे या बांधकामासाठी खर्च केल्याबद्दल लेखापालावर संतापला. त्याने तातडीने कल्याण मंडपाचे बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे आजपर्यंत हे मंडप अपूर्ण राहिले असल्याची अख्यायिका आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही कॅम्पिंगला चालले? ही बातमी वाचा आणि करा नियोजन

loading image
go to top