उन्हाळ्यात फिरायला जायचा प्लॅन आहे?, मग उत्तर-पूर्व भारतातील 'या' ठिकाणांना जरुर एकदा भेट द्या..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : मार्च ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या काही दिवसांपर्यंत उत्तर भारतात अतिशय गरम वातावरण असते. या महिन्यात उत्तर भारत, तसेच इतर राज्यांतील लोक जास्त उष्मामुळे थंड आणि सुखद शहराला भेट देण्याची योजना आखतात. परंतु, योग्य माहिती नसल्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या हंगामात फिरण्यासाठी जात नाहीत. अशा परिस्थितीत, पूर्व भारतातील काही उत्तम ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीने खूपच अल्हाददायक आहेत. पूर्व भारतातील मिझोरमची राजधानी आयझोल / आयझॉल हे पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

धबधबे, तलाव, सुंदर पर्वत इत्यादींसारख्या आश्चर्यकारक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेले 'आयझॉल' उन्हाळ्याच्या हंगामात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हे ठिकाण उत्तर-पूर्वमधील बेस्ट हनिमून प्लेससाठी देखील प्रसिद्ध आहे. जर आपणही उन्हाळ्याच्या हंगामात भेट देण्याचा विचार करीत असाल, तर पूर्व भारतात आपल्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. चला तर मग, इथल्या काही प्रमुख ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात..

रुंग्डिल तलाव

मिझोराममध्ये चार मोठे महत्वाचे तलाव आहेत, त्यातील तिसरा रुंग्डिल तलाव. आयझोल शहरापासून थोड्या अंतरावर असलेले हे तलाव पर्यटकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे. मिझोरामसह आयझॉलला भेटायला, जे काही पर्यटक येतात, ते या तलावाला भेट देण्यास विसरत नाहीत. या तलावाशेजारी सदाबहार झाडे आहेत, जी या जागेला आणखी खास बनवतात. त्याचप्रमाणे आपण पलक टिपो तलाव, तामदिल तलाव आणि चौथा रंगदिल तलाव देखील पाहू शकता.

रियक पीक

आयझॉलमधील रुंग्डिल तलावाला भेट दिल्यानंतर आपण रियक पीकजवळ पोहोचता. आयझॉलमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे रियक पीक. येथून आपण सहजपणे निम्म्याहून अधिक आयझॉलमधील पर्यटनस्थळे तेही बसल्या बसल्या पाहू शकता. या शिखरावर पोहोचताच थंड हवा आणि सुंदर दृश्ये आपल्याला नक्कीच मोहून टाकणारी आहेत. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. 

सोलोमन मंदिर

कोणत्याही सहलीत धार्मिकस्थळाला स्थान देणे महत्वाचे आहे. जर तुम्हीसुद्धा आयझॉलमधील धार्मिक ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सोलोमन मंदिराला भेट दिलीच पाहिजे. डोंगराच्या मध्यभागी असलेले हे विशिष्ट मंदिर संगमरवरी दगडाने बांधले गेले आहे. म्हणजेच, एक प्रकारे आपण मंदिर दर्शनासह नैसर्गिक दर्शनाचा देखील येथे आनंद घेऊ शकता. हे मंदिर आयझॉलचे सर्वात मोठे मंदिर मानले जाते.

मिझोराम संग्रहालय

जर आपणास मिझोराम आणि आयझॉलचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर आयझॉलमधील मिझोराम राज्य संग्रहालयाला ​​भेट दिलीच पाहिजे. येथे आपल्याला आयझॉलची समृद्ध संस्कृती पाहण्याची आणि जाणून घेण्याची संधी मिळेल. या संग्रहालयात मिझोराम आणि आयझॉलच्या स्थापनेपासून युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणी गोळा केल्या आहेत. याचीही तुम्हाला माहिती मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com