गोव्याला जाताय? हे बिच तुम्हाला माहिती आहेत का?

टीम-ई-सकाळ
Friday, 13 December 2019

गोवा म्हटले की देशी-विदेशी पर्यटकांच्या डोळ्यांसमोर हमखास येतात ते गोव्यातील हरमल, मांद्रे, मोरजी, आश्‍वे, मिरामार, पाळोळे यासारखे प्रसिध्द समुद्रकिनारे. पण असेही समुद्रकिनारे गोव्यात आहेत की जे शांत व माणसांची जास्त वर्दळ नसल्यामुळे रोमॅन्टीक स्पॉट बनलेले आहेत. शांत वातावरण व गर्दी नसणारी ठिकाणे पसंत करणाऱ्या पर्यटकांसाठी हमखास भेट देण्याची ती ठिकाणे बनलेले आहेत.

गोवा म्हटले की देशी-विदेशी पर्यटकांच्या डोळ्यांसमोर हमखास येतात ते गोव्यातील हरमल, मांद्रे, मोरजी, आश्‍वे, मिरामार, पाळोळे यासारखे प्रसिध्द समुद्रकिनारे. पण असेही समुद्रकिनारे गोव्यात आहेत की जे शांत व माणसांची जास्त वर्दळ नसल्यामुळे रोमॅन्टीक स्पॉट बनलेले आहेत. शांत वातावरण व गर्दी नसणारी ठिकाणे पसंत करणाऱ्या पर्यटकांसाठी हमखास भेट देण्याची ती ठिकाणे बनलेले आहेत. अशा समुद्र किनाऱ्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात. हे फारसे प्रसिध्द नसलेले समुद्र किनारे म्हणजे काकोळे, बटरफ्लाय बीच, गालजीबाग, होलान्त, आगोंद, शिरदोण आणि काबो देराम यांची थोडक्यात माहिती.

तर लडाखमध्ये पर्यटनावर होणार विपरित परिणाम

आगोंद समुद्रकिनारा - दक्षिण गोव्यात पणजी शहरापासून 70 किलोमीटर दूर असणारा आगोंद समुद्रकिनारा नवविवाहीत जोडपी तसेच एकांतवास पसंत करणाऱ्या तरूण पर्यटकांचे पहिले आकर्षण आहे. काही पर्यटक तर कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर तंबू ठोकून रात्र इथेच घालविणेही पसंत करतात.

जुन्नरमधील वारसा जपायला हवा

Image result for agonda beach goa

बेताळभाटी समुद्रकिनारा - दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात माजोर्डा आणि कोलवासारख्या ठिकाणांच्या मधोमध येणारा बेताळभाटी समुद्रकिनारा पणजीपासून ३१.७ किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे बरीच विवाहीत जोडपी मधुचंद्रासाठी गोव्यात आल्यावर बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर येत असल्याने तसेच तरूण जोडपी व प्रेमी युगुले येत असल्याने या समुद्रकिनाऱ्याला लव्हर्स बीच (प्रेमिकांचा समुद्रकिनारा) हे टोपणनावही पडलेले आहे. गोव्यातील तसेच देशातील इतर राज्यातून इकडे पर्यटनासाठी येणारी बरीच कुटुंबे पिकनिक स्पॉट म्हणून बेताळभाटी समुद्रकिनाऱ्याची निवड करतात. त्याचप्रमाणे इथे आढळणारे डॉल्फिन मासेही समुद्रकिनाऱ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

ट्रेकर्स म्हणतात; मी पुन्हा येईन...पुन्हा येईन

Image result for betal bhati sea goa

बेतुल समुद्रकिनारा - साळ नदीजवळ मोबोर समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिण भागात असलेला बेतुल समुद्रकिनारा मडगाव शहराच्याजवळ येतो तसेच मध्यम हवामान व समुद्रावरून येणाऱ्या मंद व थंड कोमल वाऱ्याची झुळुकीमुळे पर्यटकांना हवाहवासा वाटतो. पणजीपासून हा समुद्रकिनारा 49.5 किलोमीटर अंतरावर आहे.

जंगलातले दोन दिवस

Image result for betul beach goa

बटरफ्लाय समुद्रकिनारा (बटरफ्लाय बीच) - वास्को शहराच्या दक्षिण दिशेला व पाळोळे समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेकडील मुखाकडे अर्धगोलाकृती भागाने टेकलेल्या या समुद्रकिनाऱ्याला बटरफ्लाय बीच असे नाव पडले, तेच मुळात या भागात स्वच्छंदपणे बागडणाऱ्या फुलपाखरांमुळे. डॉल्फीन, खेकडे व गोल्डफिशसारखे इतर अनुक्रमे जलचर व उभयचर जीवही या समुद्रकिनाऱ्यावर व पाण्यात बागडताना पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंदाची अनुभूती. त्याचप्रमाणे काकोळे, गालजीबाग, होलान्त, शिरदोण आणि काणकोण येथील काब देराम समुद्रकिनारेही फारसे प्रसिद्ध व वर्दळ नसणारे असूनही पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले आहेत.

Image result for butterfly beach goa

काकोळे किनारा - दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील हा पर्यटकांना अपरिचित असलेला आणखी एक किनारा. मडगाववरून २९ किलोमीटर अंतरावर हा किनारा आहे.

Image result for kakolem beach

आरोशी किनारा - दक्षिण गोव्यातील सासष्टीतील कुळे गावापासून जवळ असलेला हा किनारा. पांढरी वाळू या किनाऱ्यावर पहायाला मिळते, त्याशिवाय सायंकाळची वेळ या किनाऱ्यावर आल्हाददायक अनुभव देणारी असते. पणजीपासून हे ठिकाण ४५ किलोमीटर आहे.

Image result for arossim beach goa

तळपण किनारा - काणकोण तालुक्यातील प्रसिद्ध गालजीबाग किनाऱ्यापासून हा किनारा जवळ आहे. पामची, सुरूची झाडे किनाऱ्यावर असेली झाडे निसर्गाची अनुभूती देतात.

Image result for talpan beach


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven unknown beaches in goa information in marathi