लोणारच नव्हे, जगात दहा ठिकाणी आहेत गुलाबी तळी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

जगात कायमस्वरुपी गुलाबी आणि लाल रंगांची असलेली सरोवरे आहेत. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्यामुळे त्या सरोवरांची चर्चा पुन्हा होत आहे. 

जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराचे पाणी गेल्या आठवड्यात अचानक गुलाबी रंगाचे झाले होते. यानंतर अनेकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं तर काही भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते जैविक प्रक्रियेमुळं असं घडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जगात अशी कायमस्वरुपी गुलाबी आणि लाल रंगांची सरोवरे आहेत. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्यामुळे त्या सरोवरांची चर्चा पुन्हा होत आहे. 

Lake Hillier from Above

ऑस्ट्रेलियाच्या मिडल आयलंडमध्ये लेक हिल्लिअर नावाचं सरोवर आहे. गुलाबी सरोवरांपैकी सर्वात प्रसिद्ध असं हे सरोवर आहे. एका बाजुला निळाशार अथांग समुद्र असताना सरोवरातील पाणी मात्र कायमस्वरुपी गुलाबीच दिसते. 

Lake Retba : Best Pink Lakes In the World

सेनेगलमध्ये असलेलं लेक रेत्बा हे लेक रोझ म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये मृत समुद्राप्रमाणेच मीठाचे प्रमाण आहे. मात्र या पाण्यापासून त्वचेला धोका संभवतो. 

Hutt Lagoon - Attraction - Tourism Western Australia

ऑस्ट्रेलियात गुलाबी सरोवरांची संख्या जास्त आहेत. हट्ट लागून समुद्र सपाटीपेक्षा खाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीला असलेलं हे सरोवरही प्रसिद्ध आहे.

Pink Lakes, Murray-Sunset

 पिंक लेक नावाचे सरोवर ऑस्ट्रेलियातील मुर्रे सनसेट नॅशनल पार्कमध्ये आहे. याचा गुलाबी रंग हा काही काळासाठीच असतो. मीठाचे योग्य प्रमाण आणि अल्गिवर सुर्य प्रकाश पडल्यानंतर याचा रंग बदलतो. 

Salina de Torrevieja

स्पेनमधील Torrevieja हे मीठागार आणि मासेमारीसाठी ओळखलं जातं. मेडिटेरॅनीअन समुद्रात असलेल्या Salina de Torrevieja सरोवराचा रंगही गुलाबी आहे. मीठाचे प्रमाण कमी असूनही याचा रंग अजुनही कोडंच आहे. 

Dusty Rose

Dusty Rose Lake हेसुद्धा कमी मिठाचं प्रमाण असलेलं गुलाबी रंगाचे सरोवर आहे. कॅनडात असलेल्या या तळ्याचा रंगही गुलाबी कसा याचं उत्तर अजुनही मिळालेलं नाही. 

Masazir Lake

अझेरबैजन इथं असलेलं Masazir Lake हेसुद्धा गुलाबी रंगामुळे प्रसिद्ध आहे. मीठाचं प्रमाण जास्त असल्यानं याठिकाणी पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे. 

Quairading Pink Lake

ऑस्ट्रेलियातील Quairading Pink Lake हा गुलाबी सरोवरांमधील एक अद्भुत असं ठिकाण आहे. याच्या बरोबर मधून रस्ता गेला असून दोन्ही बाजुला वेगवेगळ्या रंगाचे पाणी दिसते. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये हे सरोवर आहे.

Laguna Colorada Flamingos

दक्षिण अमेरिकेत असलेल्या बोल्व्हियामधील Laguna Colorada या सरोवराचा रंग गुलाबी आणि लाल असा होतो. मीठाचे प्रमाण आणि इतर नैसर्गिक परिस्थिती यानुसार याचा रंग बदलतो. 

Champagne Pool

Champagne Pool नावाचे सरोवर न्यूझीलंडमध्ये आहे.  इतर सरोवरांपेक्षा हे सरोवर वेगळे आहे. याठिकाणी carbon dioxide चे बुडबुडे सतत वर येत असतात. वर्षातून बऱ्याचदा याचा रंग गुलाबी होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top 10 pink lake in world see photos