बेबीमूनसाठी जाताय! तर ही आहेत सर्वांत बेस्ट डेस्टिनेशन्स,

Babymoon News
Babymoon News

नवी दिल्ली : सध्या प्री वेडिंग आणि हनीमूनप्रमाणे बेबीमूनही ट्रेंडिंगमध्ये आहे. जोडपे बेबीमून संस्मरणीय बनवण्यासाठी परदेश प्रवासही चूकवू शकत नाहीत. मात्र कोरोना महामारीत प्रवास करणे योग्य नाही. तसेच या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. जर निष्काळजीपणा केला, तर बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी देशातील अनेक भागांमध्ये बेबीमूनवर जाऊ शकता. जर तुम्ही येणाऱ्या काळात बेबीमून ट्रिपचे नियोजन करत असला तर ही स्थळे बेबीमून संस्मरणीय बनविण्यासाठी सर्वोत्तम आहेत. तर चला जाणून घेऊ बेबीमून काय आहे आणि ते संस्मरणीय बनविण्यासाठी कोणती स्थळे फायदेशीर ठरतील...


*बेबीमून काय आहे?
हे हनीमूनप्रमाण आहे जिथे पती आपल्या गरोदर पत्नीबरोबर कोणत्यातरी चांगल्या डेस्टिनेशनवर जातात. या ट्रिपच्या दरम्यान नव्या जीवनाला सुरवात होते. जेव्हा घरात लहानशा पाहुण्याच्या किंकाळीचे आवाज घुमते. हा वेळ जोडप्यासाठी महत्त्वाचा असतो. ते वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केलो जातो. यात पती-पत्नी एकत्र राहून महत्त्वाचे क्षण व्यतीत करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुखी हार्मोनचा परिणाम मुलावरही होतो.

उदयपूर
हे शहर अरवली पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे. यामुळे उदयपूरला महाल आणि तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. हे बेबीमूनर्ससाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर निवांत वेळ घालवू शकतात. तसेच खरेदीचाही आनंद लूटू शकता.

पुदुचेरी
तणाव आणि चिंतेतून मुक्त होण्यासाठी पुदुचेरी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्ही बेबीमून ट्रिपचे नियोजन करत आहात, तर पुदुचेरीला जाऊ शकता. वाळूच्या रेतीवर पडून फ्रेंच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सूर्यास्त पाहणे हे सुखद क्षण ठरु शकते. या व्यतिरिक्त पुदुचेरीत जलक्रीडेचाही अनुभव घेऊ शकता.

महाबळेश्वर
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे शहर आपल्या सौंदर्य, धबधबे आणि हिरवाईसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईपासून केवळ काही अंतरावर महाबळेश्वर पर्यटनस्थळ आहे. जोडपे आणि बेबीमूनर्ससाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. बेबीमूनसाठी महाबळेश्वरला जाऊ शकता.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com