esakal | मिझोरमची सुंदर निर्सग संपन्न चंपाई व्हॅली; अनेक स्पाॅट पाहून तुम्हाला भरपूर देईल आनंद

बोलून बातमी शोधा

मिझोरमची सुंदर निर्सग संपन्न चंपाई व्हॅली; अनेक स्पाॅट पाहून तुम्हाला भरपूर देईल आनंद }

मिझोरम आणि म्यानमारच्या सीमेवर चांपाई व्हॅली हे एक छोटेसे शहर आहे, जे मिझोरममधील पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणी आहे.

tourism
मिझोरमची सुंदर निर्सग संपन्न चंपाई व्हॅली; अनेक स्पाॅट पाहून तुम्हाला भरपूर देईल आनंद
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारताच्या ईशान्येकडे अनेक राज्य निर्सगाने परिपूर्ण असे राज्य आहे. यामध्ये मिझोरम राज्यातील चंपाई व्हॅलीची वेगळी ओळख आहे. या व्हॅलीतील सुंदरता, निसर्ग पाहून तुम्ही प्रसन्नीत नक्कील व्हाल. 

मिझोरमच्या सीमेवर ही व्हॅली ही स्वतःच एक नंदनवन आहे. जर या ठिकाणी जायचे असेल तेथील निर्सग, सुंदर स्पाॅट बघायचे वाटत असेल, तर चला आम्ही तुम्हाला या व्हॅलीतील विविध स्थळांची बघूया माहिती...  

पर्यटकांचे आवडतीचे ठिकाण
मिझोरम आणि म्यानमारच्या सीमेवर चांपाई व्हॅली हे एक छोटेसे शहर आहे, जे मिझोरममधील पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणी आहे. चांपाई व्हॅली केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक नैसर्गिक देखावे हे आपल्याला भरपूर आनंद देतात. तसेच अनेक तलाव आणि धबधबे देखील येथे आहे. 

संस्कृती, परंपराचे दर्शन

इथल्या लोकांची वागणूक अगदी साधी सोपी असून इथली  संस्कृती व परंपरा अजूनही संपूर्ण उत्तरपूर्व मध्ये सर्वात प्रसिद्ध मानली जाते. सध्याच्या युगात, गडबडीपासून दूर, चांपाई व्हॅली कोणासही स्वतःचे बनवेल. ईशान्य भागात या ठिकाणी तांदळाचा वाडगा असेही म्हटले जाते कारण येथे सर्वात जास्त लागवड केली जाते. 

चांम्फाई खोरे

चांम्फाई खोरे या ठिकाणी एक तलाव आहे, जे पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आधी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. 

राष्ट्रीय उद्यान 

जर वन्यजीव पाहण्यास आवडत असेल तर आपण चांपाई खोऱ्यातील मुल्ला राष्ट्रीय उद्यानास भेट दिली पाहिजे. सुमारे 100 चौरस किमी क्षेत्रामध्ये वसलेले, आपल्याला हिमालयीन काळे अस्वल, बिबट्या वाघ आणि इतर अनेक प्राणी दिसतील. चंपाईकडे बर्‍याच लेण्या देखील असल्याचे सांगितले जाते.

कसे पोहोचाल

चंपाईला जाण्यासाठी आयजॉल पासुन रस्त्याने येता येते. आयजॉलला पोहोचण्यासाठी आपण विमानाने देखील जाऊ शकतात. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बैराबी किंवा सिलचर आहे जिथून आपण चंपाईला जाऊ शकता. येथे सहजपणे राहण्यासाठी अतिथी घरे आणि हॉटेल आहेत.